Mumbai 26/11 attack: मुंबई दहशतवादी हल्ल्या 26/11 म्हंटल की ती काळी रात्र आजही डोळ्यासमोरून जात नाही. समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरले होते. या दहशतवादी हल्ल्याला 26 नोव्हेंबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षपूर्तीनिमित्त, राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी हल्ल्याच्या गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा उपस्थित केला. जवळपास 18 वर्षे उलटूनही देश तो भीषण दिवस विसरलेला नाही. अजमल कसाबला फाशी देण्यात आली आहे, पण सर्वात मोठा प्रश्न आजही कायम आहे. भारत या हल्ल्याच्या गुन्हेगारांपर्यंत कधी पोहोचणार आणि 166 पीडितांना पूर्ण न्याय कधी मिळणार, असा सवाल उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे.
उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले?
आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ते 10 दहशतवादी कोण होते, त्यांनी मुंबईला लक्ष्य का केले आणि त्यांचा हेतू काय होता? भारताने दहशतवादाला इतक्या जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला होता की, भविष्यात देशावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. मुंबई हल्ल्यातील दोषी मोहम्मद अजमल अमीर कसाबला फाशी देण्यात आल्याने ते समाधानी आहेत, परंतु हल्ल्याच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणे आणि सर्व 166 पीडितांना न्याय मिळवून देणे हे अजूनही एक मोठे आव्हान आहे.
तसेच पाकिस्तानवर निशाणा साधत, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे आणि भारताविरोधात सतत द्वेष पसरवण्याचे धोरण ते अवलंबत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, भारत आता फरार दहशतवाद्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा संहितेच्या (BNSS) तरतुदींनुसार फरार दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई हल्ल्यांदरम्यान दहशतवाद्यांना सूचना पुरवणाऱ्या पाकिस्तानातील सूत्रधारांवरही कठोर कारवाईची तयारी केली जात आहे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/11/25/even-after-18-years-that-fateful-night-cannot-be-forgotten-untold-stories-from-the-26-11-attacks-and-memories-of-the-martyrs/
या दिशेने लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हल्ल्यामागे कट रचणाऱ्या आणि दहशतवाद्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Mumbai: On the anniversary of the 26/11 Mumbai terror attacks, Senior Advocate and Rajya Sabha MP Ujjwal Nikam says, “Nearly 18 years have passed, but we have still not been able to forget that day. A question continues to remain in the mind of every Indian: Who were those 10 terrorists? Why did they attack Mumbai? What did they want and what were they trying to achieve? We gave them only one answer: we will respond to terrorism in such a way that no one dares to carry out another terror attack in our country… I am happy that we hanged Mohammad Ajmal Amir Kasab. But another question remains: Have we been able to reach those who conspired to plan the attack? Have we been able to deliver justice to the 166 victims? If not, why?…”
— ANI (@ANI) November 25, 2026
26 नोव्हेंबर 2008
लश्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी हल्ला केला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल, लिओपोल्ड कॅफे आणि नरिमन हाऊस या ठिकाणांना अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. सुरक्षा दलांनी एक मोहीम राबवून नऊ दहशतवाद्यांना ठार केले, तर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. मे 2010 मध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात त्याला फाशी देण्यात आली. मात्र या हल्ल्यात देशाचे रक्षण करताना पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही सर्वोच्च बलिदान दिले.