Home मुख्य पोस्ट शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

0
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
नेते शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती फोटो सौजन्य: ANI News

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार ह्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली आहे. त्यांच्या तब्येतीविषयीची अपडेट त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत माहिती दिली आहे. वडिलांच्या तब्येतीची माहिती कळताच सुप्रिया सुळे बैठकीतून निघून रुग्णालयाकडे रवाना झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवरून आणि एक्स पोस्ट शेअर करत लिहिले की, “डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.” दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवारही उपस्थित राहणार होते, परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने सुप्रिया यांना बैठक अर्धवट सोडून जावे लागले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2 नोव्हेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास आणि संसर्गामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांना दुसऱ्यांदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 7 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here