Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

0
Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी
(Photo: Twitter/x)

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान व सुलभ करणाऱ्या मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काल प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन आढावा घेतला.वेसावे ते भाईंदर या दोन शहरांना किनारी मार्गाने जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता अशा एकूण सात पॅकेजमध्ये करण्यात येत आहे.

प्रकल्पाच्या पॅकेज ए अंतर्गत अमरनाथ टॉवर, कवठे खाडी येथील कामांची बांगर यांनी पाहणी केली. या ठिकाणच्या कामांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची संख्या वाढवावी, तसेच या ठिकाणी तात्पुरता पोहोच रस्ता आणि काटकोनात तात्पुरता पूल उभारणी यांची कामे समांतर पद्धतीने व्हावी, जेणेकरून कामे गतीने पुढे जातील, असे निर्देश बांगर यांनी दिले.(Coastal Road Project)

https://www.prahaar.in/2026/11/26/the-wood-based-cremation-facility-at-the-kandivali-dahanukarwadi-crematorium-will-be-temporarily-closed-from-november-28-to-december-2-2026/

लोखंडवाला आंतरबदल याठिकाणी प्रत्यक्ष पुलाच्या पायलिंगचे काम सुरू झाले आहे. येथे पुलाच्या पायलिंगसोबतच अदानी पावरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी शिफ्ट करायची आहे. याचेही पायलिंगचे काम त्वरित सुरू करावे आणि पायलिंग सुरू केल्यापासून 100 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करावे.जेणेकरून मर्यादित कालावधीमध्ये उच्च दाबाची विद्युत वाहिनी शिफ्ट करता येईल. आणि प्रत्यक्ष पुलाचे काम सुरू होईल, असे बांगर यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या पॅकेज बी अंतर्गत माईंडस्पेस मालाड आंतरबदलाची बांगर यांनी संपूर्ण पाहणी केली. याठिकाणी जवळपास चार हजार मीटर लांबीचा तात्पुरता प्रवेश पूल बांधला जाणार आहे. येथे सात दिशेने समांतर पध्दतीने टॅबची पायलिंग केले जाईल हे सुनिश्चित करावे. तसेच हा टॅब बांधणीचा दर कुठल्याही परिस्थितीत दोन मीटर प्रति दिवसपेक्षा खाली येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

https://www.prahaar.in/2026/11/26/egypt-tanker-fire-tanker-overturns-and-highway-goes-up-in-flames-31-dead-in-egypt/

पॅकेज सी येथे रहेजा यांच्या जमिनीच्या ठिकाणी रिट्रीवल शाफ्ट तयार केला जाणार आहे. त्या जागेची बांगर यांनी आज पाहणी केली. तसेच या जागेच्या पायलिंगचे काम त्वरित सुरू करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. त्याचप्रमाणे चारकोप येथे लॉन्चिंग शाफ्टची पाहणी केली. लॉन्चिंग शाफ्ट मध्ये सध्या खोदकाम सुरू आहे. जवळपास दहा मीटर पर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी दररोज 1350 क्युबिक मीटर या गतीने सध्या खोदकाम सुरू आहे.(Mumbai Infrastructure)

या शाफ्टचे काम 31 मार्च 2027  पर्यंत पूर्ण करून 1 एप्रिल 2027 पासून टनेल बोरिंग मशीनची जोडणी आणि 31 मे 2027 रोजी टनेल बोरिंग मशीनने पहिल्या बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात, असे नियोजन आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 जुलै 2027 रोजी दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात केली जाणार आहे. पहिले टनेल मशीन मालाड येथील रिट्रीवल शाफ्ट येथे जुलै 2027 पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. तोपर्यंत मालाड चा रिट्रीवल शाफ्ट पूर्ण होईल, असे नियोजन करून काम करावे असे निर्देश बांगर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here