Home क्रीडा Asia Cup Rising Stars 2026: भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव

Asia Cup Rising Stars 2026: भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव

0
Asia Cup Rising Stars 2026: भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव
भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव (Photo: BCCI)

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारताला उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं 318 धावांचं आव्हान श्रीलंकेने सहज गाठलं. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 317 धावा केल्या आणि विजयासाठी 318 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने 41.3 षटकात 2 गडी गमवून सहज गाठलं. तिलक वर्मा सामन्यानंतर म्हणाला की, ‘माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की सुरुवातीची पहिली 15 षटकं खूप महत्त्वाची असतील. जर आपण त्यांना प्रति षटक सहा धावांच्या आसपास रोखू शकलो, तर ते आपल्यासाठी खूप चांगले होईल. नंतर खेळपट्टी थोडी संथ होते. आम्ही हेच नियोजन केले होते, पण दुर्दैवाने आम्ही ते अंमलात आणू शकलो नाही.’

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेने विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरूवात केली. लसिथ क्रूसपुल आणि सिनेथ जयवर्धना यांनी विजयाचा पाया रचला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 174 धावांची भागीदारी केली. तर सिनेथ जयवर्धना 70 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारत 105 धावा करून बाद झाला. त्यानंतर लसिथ क्रूसपूल आणि निशान मदुष्का यांची जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. लसिथ 107 चेंडूत 116 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर निशान मदुष्का आणि पवन रत्नायके यांनी विजयी धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 53 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून हर्षित राणा आणि शहबाज अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.

https://www.prahaar.in/2026/11/26/mumbais-sensational-run-in-the-2026-syed-mushtaq-ali-trophy-6th-win-in-7-matches-thrilling-encounters-against-puducherry-and-haryana/

भारताचा डाव

भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही स्फोटक जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 80 धावांची भागीदारी केली. वैभव सूर्यवंशी या सामन्यात 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार तिलक वर्मा ही जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 79 धावा केल्या. अभिषेक शर्मा 63 चेंडूत 78 धावा करून बाद झाला आणि धावगती संथ झाली. कुमार कुशाग्र 21 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या तिलक वर्माची विकेट पडली आि भारतीय संघ अडचणीत आला. रिंकु सिंह 12 धावा, सूर्यांश शडगे 10, तनुष कोटियन 28, हार्षित राणा 0 धावा करून बाद झाला. तर शहबाज अहमद नाबाद 54 आणि हर्ष दुबे नाबाद 8 धावांवर राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here