Home ब्रेकिंग न्यूज AI In Governance: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात परिवर्तन घडविण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’

AI In Governance: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात परिवर्तन घडविण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’

0
AI In Governance: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात परिवर्तन घडविण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’
Photo : DGIPR

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या यजमानपदाखाली गव्हकनेक्ट (GovConnect) या संस्थेच्या वतीने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे. ‘फ्रॉम डिजिटल टू इंटेलिजंट डिझायनिंग दी नेक्स्ट गव्हर्नन्स ऑफ गव्हर्नन्स या संकल्पनेवर आधारित या परिषदेत केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रशासन, उद्योग आणि समाजव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा होणार आहे.

परिषदेचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या स्वागतपर भाषणाने होणार आहे. यावेळी Deloitte India चे प्रतिनिधी अभ्रजित रे, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संयुक्त सचिव डॉ. वर्णाली डेका, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी तसेच मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी मार्गदर्शन करणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/26/manoj-muntashirs-special-message-to-the-youth-also-shares-a-clear-opinion-on-ai/

परिषदेत ‘इंटेलिजंट स्टेट : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शासन अधिक पूर्वानुमानक्षम होऊ शकते का?’, ‘विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सार्वजनिक सेवा’, ‘नागरिक २.० : अधिक जलद, स्मार्ट आणि सर्वसमावेशक प्रशासनासाठी एआय आधारित सार्वजनिक सेवा’, ‘सुरक्षित, जबाबदार आणि सर्वसमावेशक प्रशासनासाठी विश्वासार्ह एआय’ तसेच ‘एआय सक्षम भारतासाठी संगणकीय क्षमता, क्लाऊड, डेटा आणि पायाभूत सुविधा’ या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here