मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याच्या मोबदल्यात खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी मिश्कील प्रतिक्रिया देत, ‘गेल्या 12 वर्षांपासून माझा शपथविधी होत आहे. मला या कथांमध्ये रस नाही,’ असे स्पष्ट केले. राजकीय पदांपेक्षा धोरणात्मक विषयांवर प्रश्न विचारले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या चर्चांवर सावध भूमिका घेतली.(Supriya Sule)
https://www.prahaar.in/2026/11/25/actress-shraddha-kapoor-movie-eetha-makes-history-name-entered-into-the-asia-book-of-records-and-asia-book-of-records/
संसदेतील लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांनी सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी, “कालपर्यंत मी केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा सुरू होती, आता मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. गेली 12 वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करू नका. 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय. मला या कुठल्याही कथांमध्ये रस नाही. मला फक्त एका गोष्टीचे दुःख आहे की, ज्या धोरणनिर्मितीसाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबद्दल गांभीर्याने कोणी विचारत नाही. मी सध्या चार संयुक्त संसदीय समित्यांवर (जेपीसी) आहे. देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, हे माझे भाग्य आहे. त्याबद्दल कोणी प्रश्न विचारला, तर मला मनापासून आनंद होईल. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. चार जेपीसींमध्ये देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरू आहे. या विधेयकांचा तुमच्या-आमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया दिली.(Maharashtra Politics)
https://www.prahaar.in/2026/11/25/archit-the-child-actor-from-killa-now-in-zhimma-3-hemant-dhome-offers-a-special-opportunity/
सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही विचारण्यात आले. त्यावर त्यांनी, “जोपर्यंत याबाबत अधिकृतरीत्या कोणी बोलत नाही, तोपर्यंत मी भाष्य करणार नाही. आमचे महायुतीचे सरकार मजबूत आहे. आमच्याकडे 238 आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे 132, आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 60 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत. त्यामुळे आमचे राजकीय चित्र स्पष्ट आहे. सुप्रिया ताई आगामी विधेयकात 50 टक्के समान जागा मान्य करणार असतील, तर लोकसंख्येचा विचार न करता सध्याची स्थिती गृहीत धरली पाहिजे. त्यांनी एनडीएचा घटक म्हणून येण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे स्वागत करेन. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लोकसभा मतदारसंघांसाठी ज्या जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या, त्या तुलनेत आता लोकसंख्या चार पटीने वाढली आहे,” असे त्यांनी सांगितले.(Maharashtra CM)