वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत लागू होते. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत युएईविरुद्ध खेळताना वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोंघावलं. त्याने वेगवान शतक आणि द्विशतकाचा विक्रम मोडीत काढले. (Photo: BCCI Twitter)वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून आधीचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर त्याने 40 चेंडूंमध्ये 150 धावा करून स्वतःचाच विक्रम मोडला आणि मग षटकार मारून 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण करत इतिहास रचला. (Photo: BCCI Twitter)वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूत 204 धावा केल्या आणि बाद झाला. पण या दरम्यान त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. असं असलं तरी दोन मोठे विक्रम वैभवच्या तावडीतून वाचले. त्यामुळे हे दोन विक्रम येत्या काळात रडारवर असणार आहेत. (Photo: BCCI Twitter)वैभवच्या रडारवर असलेले दोन्ही विक्रम भारतीय खेळाडूच्या नावावर आहेत. नारायण जगदीसनने हे विक्रम रचले आहेत. विजय हजारे ट्रॉफीत एकाच डावात त्याने हे दोन्ही विक्रम केले होते. (Photo: Instagram)नोव्हेंबर 2022 मध्ये, जगदीसनने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या 124 चेंडूंमध्ये 250 धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद 250 धावा आहेत. त्याच डावात जगदीसनने 277 धावा केल्या. ही लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo: Instagram)युएईविरुद्ध वैभवची फलंदाजी पाहता हे दोन्ही विक्रम धोक्यात आहेत आणि ते कधीही मोडले जाऊ शकतात. इतकेच नाही, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरल्यास वैभवला आश्चर्य वाटायला नको. (Photo: BCCI Twitter)