Home ताज्या घडामोडी नोएडातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना! इमारतीच्या 19व्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

नोएडातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना! इमारतीच्या 19व्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

0
नोएडातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना! इमारतीच्या 19व्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
नोएडातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना! इमारतीच्या 19व्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू फोटो सौजन्य: सोशल मीडिया

उत्तर प्रदेश: नोएडा शहरातील सेक्टर-39 पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोटस बुलेवार्ड सोसायटीमध्ये मंगळवारी पहाटे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. सोसायटीतील एका इमारतीच्या 19व्या मजल्यावरून पडून 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोसायटी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/24/amit-shah-and-sukhbir-singh-badal-will-held-press-conference-alliance-likely-possible-in-bjp-and-akali-dal/

16 वर्षीय, मृत विद्यार्थिनीचे नाव, दिशिता दुबे असं असून ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती. ती आपल्या कुटुंबासोबत लोटस बुलेवार्ड सोसायटीमध्ये वास्तव्यास होती. तिचे वडील एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असून, हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने दिशिताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईकांना आणि तिच्या मित्रमंडळींना प्रचंड धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास दिशिता तिच्या राहत्या घरातील बालकनीतून खाली कोसळल्याची माहिती समोर आली. इतक्या उंचावरून खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेपूर्वी रात्री दिशिताने कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र जेवण केले होते. त्यावेळी घरातील वातावरण सर्वसामान्य होते आणि कोणताही तणाव किंवा वेगळी बाब जाणवली नव्हती, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, दिशिता गेल्या काही दिवसांपासून अभ्यासामुळे मानसिक तणावाखाली होती. नेमक्या कोणत्या परिस्थितीत ती बालकनीतून खाली पडली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.

https://www.prahaar.in/2026/11/24/explainer-renaming-west-bengal-naming-of-states-in-india-legal-procedures-history-and-the-context-involving-the-cm-suvendu-adhikari/

अपघात की इतर कोणते कारण यामागे आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दिशिताचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्याची सखोल तपासणी करण्यात येत आहे. मोबाईलमधील संभाषणे, मेसेजेस आणि इतर तपशिलांद्वारे घटनेपूर्वी काय घडले असावे, याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, कुटुंबातील सदस्यांची आणि जवळच्या व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकेल. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक अँगलने गांभीर्याने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल, मोबाईल तपासातील निष्कर्ष आणि साक्षीदारांचे जबाब या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here