Home ब्रेकिंग न्यूज Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

0
Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?
(Photo: Facebook)

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले, तेच अतिक्रमण! ही नाट्यमय पुनरावृत्ती पाहून नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबई महापालिका आयुक्तांच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’ला यशस्वी होऊ नये म्हणूनच काही विभाग स्तरावरील अधिकारी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत का असा सवालच उपस्थित केला आहे.(Pedestrian First)

https://www.prahaar.in/2026/11/24/security-in-parks-playgrounds-and-open-spaces-will-be-enhanced/

स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तिवाना यांनी पी पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत “आयुक्तांच्या मिशन पेडेस्ट्रियन फर्स्टला असफल करण्याचे आणि तिला बदनाम करण्याचे काम आपलेच अधिकारी करत असल्याचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांनी जाहीर केलेल्या या पादचारी प्रथम मोहिलेचे जनतेकडून सर्वच स्तरावर स्वागत केले जात असतानाच प्रशासकीय पातळीवरच या मोहिमेला यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप तिवाना यांनी केला.(Right To Walk)

https://www.prahaar.in/2026/11/24/passengers-left-shaken-enraged-by-being-woken-from-his-sleep-a-passenger-attacks-himself-with-a-blade-he-had-hidden-in-his-hair/

आयुक्त अश्विनी भिडे यांनी, प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये 20 रस्ते निश्चित करून पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे यासाठी ही मोहीम हाती घेतली होती. कारवाईही सुरू झाली. मात्र पी पश्चिम प्रभागातील उदाहरण देत तिवाना यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. ज्या रस्त्यांवर फुटपाथवरील अतिक्रमण हटवले गेले, तिथे पुन्हा अतिक्रमण फोफावले आहे. पादचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. “अतिक्रमण हटवल्यानंतरही पादचाऱ्यांना त्याचा वापर करता येत नाही. उलट पुन्हा तिथे अतिक्रमण झाले आहे. कोणत्या रस्त्यांवर कारवाई झाली आणि नंतर पुन्हा कसे अतिक्रमण झाले, याची यादी द्या,” अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तिवाना यांनी “पैसे घेऊन फेरीवाले पुन्हा बसविले जातात का असा संतप्त सवाल केला. सत्ता बदलली तरी अधिकारी-कर्मचारी वर्गाची मानसिकता बदललेली नाही!”(Reclaim Footpaths)

या त्यांच्या कृतीमुळे आयुक्तांच्या स्वप्नाला प्रशासकीय पातळीवरच खीळ घालण्याचा हा प्रकार आहे का, असा थेट प्रश्न प्रशासनाकडून याचे स्पष्टीकरण आणि ठोस कारवाईची मागणी केली. पादचारी सुरक्षिततेच्या मोहिमेलाच अधिकारी अडथळा ठरत असतील तर जनतेचे काय होणार? असाही सवाल त्यांनी केला.(Walkable Cities)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here