Home देश Saryu-Kamala Express : अयोध्या ते जनकपुर धावणार सरयू- कमला एक्सप्रेस, 604 किमीचा प्रवास 19 तासांत, जाणून घ्या थांबे आणि वेळापत्रक

Saryu-Kamala Express : अयोध्या ते जनकपुर धावणार सरयू- कमला एक्सप्रेस, 604 किमीचा प्रवास 19 तासांत, जाणून घ्या थांबे आणि वेळापत्रक

0
Saryu-Kamala Express : अयोध्या ते जनकपुर धावणार सरयू- कमला एक्सप्रेस, 604 किमीचा प्रवास 19 तासांत, जाणून घ्या थांबे आणि वेळापत्रक

Saryu-Kamala Express : भारत आणि नेपाळमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अयोध्या धाम ते जनकपुर धामदरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरयू-कमला एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या उद्घाटन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. ( Saryu-Kamala Express)

https://www.prahaar.in/2026/11/23/manoj-bajpayee-on-dhurandhar-manoj-bajpayees-support-to-bollywood-discussion-on-several-films-including-dhurandhar/

भगवान श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या जनकपूरला जोडणारी ही ट्रेन भाविक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या रेल्वेमुळे दोन्ही देशांतील प्रवाशांना धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.

सरयू-कमला एक्सप्रेस कुठे थांबणार?

सरयू-कमला एक्सप्रेस आठवड्यातून एकदा धावणार आहे. अयोध्या धाम ते जनकपूर धामदरम्यानचे सुमारे 604 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन 19 तासांत पूर्ण करेल. प्रवासादरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे.

या ट्रेनचे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे आहेत:

  • मानकापुर
  • बस्ती
  • गोरखपुर
  • नरकटियागंज
  • रक्सौल
  • सीतामढी
  • शिशो हॉल्ट
  • मधुबनी
  • जयनगर

सरयू-कमला एक्सप्रेसचे वेळापत्रक

गाडी क्रमांक 15595 जनकपुर धाम ते अयोध्या धामदरम्यान धावेल. ही ट्रेन 28 नोव्हेंबरपासून दर शनिवारी दुपारी 1:10 वाजता (नेपाळी प्रमाणवेळेनुसार) जनकपुर धाम येथून सुटेल आणि रविवारी सकाळी 8:10 वाजता अयोध्या धामला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 15596 अयोध्या धाम ते जनकपुर धामदरम्यान धावेल. ही ट्रेन 30 नोव्हेंबरपासून दर सोमवारी सायंकाळी 5:50 वाजता अयोध्या धाम येथून सुटेल आणि मंगळवारी दुपारी 12:40 वाजता (नेपाळी प्रमाणवेळेनुसार) जनकपूर धामला पोहोचेल.

ट्रेनमध्ये 17 डबे; एसी आणि स्लीपरची सुविधा

सरयू-कमला एक्सप्रेसमध्ये एकूण 17 डबे असतील. यामध्ये 8 एसी आणि 7 स्लीपर डब्यांचा समावेश आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी 1 पॉवर कार आणि 1 एसएलआरडी डबा असेल.

अयोध्या आणि जनकपुर या रामायण परंपरेशी संबंधित दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारी ही रेल्वे सेवा भारत-नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांना नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here