Home महत्वाची बातमी Royal Enfield : रॉयल एनफिल्डची स्वस्त बाईक लवकरच बाजारात ? किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Royal Enfield : रॉयल एनफिल्डची स्वस्त बाईक लवकरच बाजारात ? किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

0
Royal Enfield : रॉयल एनफिल्डची स्वस्त बाईक लवकरच बाजारात ? किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, कंपनीच्या बाईक्सची किंमत तुलनेने जास्त असल्याने अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा ग्राहकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रॉयल एनफिल्ड कमी बजेटमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन 250cc बाईक्स बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी नव्या 250cc प्लॅटफॉर्मवर काम करत असून याअंतर्गत एकापेक्षा अधिक मोटारसायकल बाजारात दाखल होऊ शकतात.

अनेक 250cc बाईक्स येणार ?

गेल्या काही वर्षांत रॉयल एनफिल्डने Himalayan 450, Guerrilla 450 आणि 650cc सेगमेंटमधील बाईक्सवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आता कंपनी कमी किमतीतील बाईक्सच्या माध्यमातून ग्राहकवर्ग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या नवीन 250cc बाईक्स आर्थिक वर्ष 2027-28 च्या अखेरच्या महिन्यांमध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे कंपनी केवळ एक मॉडेल आणण्याऐवजी स्वतंत्र 250cc प्लॅटफॉर्म विकसित करत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीमध्ये या प्लॅटफॉर्मला ‘V’ असे नाव देण्यात आल्याची चर्चा आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने वेगवेगळ्या डिझाइन आणि किमतींच्या बाईक्स तयार करता येऊ शकतात. याशिवाय चीनमधील बाइक निर्माता कंपनी CFMoto सोबत तांत्रिक भागीदारी होण्याचीही चर्चा आहे. मात्र, या वृत्तांना कंपनीकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नवीन बाईकमध्ये हायब्रीड इंजिन मिळणार ?

नवीन रॉयल एनफिल्ड बाईक्सच्या इंजिनबाबतही उत्सुकता वाढली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या बाईक्समध्ये हायब्रीड तंत्रज्ञान दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे पेट्रोलची बचत होण्यास मदत होऊ शकते. प्राथमिक अंदाजानुसार, नवीन बाईक्सचे मायलेज 40 ते 45 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत असू शकते. मात्र, कंपनी माइल्ड हायब्रीड सिस्टम वापरणार की अन्य तंत्रज्ञान देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे इंजिन आणि मायलेजविषयी अधिकृत माहिती समोर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/gold-silver-rate-gold-and-silver-prices-surge-again-a-significant-jump-in-the-price-of-gold-in-just-a-single-day/

किंमत किती असण्याची शक्यता ?

रॉयल एनफिल्डच्या या आगामी बाईक्सची सर्वाधिक चर्चा त्यांच्या संभाव्य किमतीमुळे होत आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन 250cc बाईक्सची सुरुवातीची किंमत अंदाजे 1.25 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. कंपनी या बाईक्स सध्याच्या 350cc मॉडेल्सपेक्षा कमी किमतीत बाजारात आणण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कमी बजेटमध्ये रॉयल एनफिल्ड खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, प्रत्यक्ष किंमत आणि फीचर्सची माहिती लॉन्चच्या वेळीच स्पष्ट होईल.

भारतात प्रीमियम बाईक्सची मागणी वाढतेय

भारतीय बाजारपेठेत 250cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सची मागणी सातत्याने वाढत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये 250cc ते 800cc सेगमेंटमधील बाईक्सची विक्री 12.7 लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. पाच वर्षांपूर्वी हा आकडा जवळपास 5.5 लाख युनिट्स होता.

तसेच एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत 200 ते 250cc बाईक्सच्या विक्रीत 75 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून विक्रीचा आकडा 1,91,126 युनिट्सवर पोहोचला आहे. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करता रॉयल एनफिल्डची आगामी 250cc बाईक बाजारात किती प्रतिसाद मिळवते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here