Home ब्रेकिंग न्यूज Viral Ghost Car China: रात्रभर ८६८ वेळा पार्किंगचा प्रयत्न! चीनमधील ‘घोस्ट कार’चा व्हिडिओ व्हायरल

Viral Ghost Car China: रात्रभर ८६८ वेळा पार्किंगचा प्रयत्न! चीनमधील ‘घोस्ट कार’चा व्हिडिओ व्हायरल

0
Viral Ghost Car China: रात्रभर ८६८ वेळा पार्किंगचा प्रयत्न! चीनमधील ‘घोस्ट कार’चा व्हिडिओ व्हायरल

रात्री जर तुम्ही तुमची कार बेसमेंटमध्ये पार्क केली आणि वर तुमच्या अपार्टमेंटमध्ये गेलात, आणि तुम्हाला तुमची कार रात्रभर पार्किंगची जागा शोधताना दिसली तर काय कराल? असाच एक प्रकार चीनमधून समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडिया सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात एक ड्रायव्हरलेस कार एका पार्किंगमध्ये मागे पुढे जाताना दिसत आहे. जेव्हा गाडीचा मालक सकाळी उठला आणि त्याने गाडीची पार्किंग हिस्टरी तपासली तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याच्या गाडीचे ऑटोमॅटिक पार्किंग फिचर रात्रभरात ८६८ वेळा सक्रिय झाले होते . या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या गाडीची चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी या गाडीला ‘घोस्ट कार’ असे म्हटले आहे.

चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चालकविरहित इलेक्ट्रिक कार पार्किंग लॉटमध्ये फिरताना दिसत आहे. ही कार कधी मागे जाते, कधी पुढे जाते आणि आपोआप पार्क होते. सुरक्षा रक्षकांनी देखील हा प्रकार पाहिला. हा प्रकार जवळपास मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चालू होता. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या आपोआप पार्किंग करताना दिसतात. एका व्हिडिओमध्ये एक Avatr ०६ आणि एक Avatr १२ एकाच वेळी तीच कृती करताना दिसतायत. सकाळी सुमारे ६ वाजता दोन्ही गाड्या पार्क करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एकाच वेळी पुढे मागे होताना दिसतात या व्हिडिओंमुळे ऑटो तंत्रज्ञान आणि सेल्फ पार्किंग वैशिष्ट्यांपैकी एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/bisleri-rejected-fssai-claim-asserting-that-its-packaged-drinking-water-is-safe-and-has-passed-testing/

चीनमधील एका ऑटोमोबाइल वेबसाइटच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हुवावेच्या ‘क्वानकुन इंटेलिजेंट ड्रायव्हिंग ओपन’ स्पर्धेदरम्यानचा आहे. ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान झाली होती. यात ८ वेगवेगळ्या गटांमध्ये १ लाख ९० हजारांहून अधिक कार मालकांनी सहभाग घेतला होता. यात ‘पार्किंग एलिट’ नावाचा एक गट होता. यात कारच्या ऑटोमॅटिक पार्किंग फीचरचा किती चांगला वापर होतो, यावरून रँकिंग ठरत होती. ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट, रिमोट पार्किंग असिस्ट, एक्झिट-अँड-पार्क असिस्ट अशा फीचर्सचा यात समावेश होता. टॉप १०० स्पर्धकांना हुवावे पॉईंट्स मिळणार होते. स्पर्धेच्या नियमानुसार सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच्याच हालचालींना गुण मिळणार होते. त्यामुळे मध्यरात्रीनंतर कारने बार-बार पार्किंग करूनही कोणताही फायदा होणार नव्हता. मग कार रात्रभर का प्रयत्न करत होती, असा प्रश्न उपस्थित होतोय.

यामागे ३ शक्यता

यामागे सध्या तीन शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता म्हणजे, कार मालकाने मोबाईल अॅपमधून कारला पार्किंगमधून बाहेर काढून पुन्हा पार्क करण्याचा प्रयत्न केला असेल. दुसरी शक्यता म्हणजे, पार्किंगमध्ये कमी प्रकाश किंवा पार्किंगच्या रेषा पुसट झाल्या असतील. अशा वेळी कारची सिस्टीम योग्य जागा ओळखू शकत नाही आणि पुन्हा-पुन्हा प्रयत्न करते. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची शक्यता म्हणजे सॉफ्टवेअरमधील बिघाड. एखाद्या तांत्रिक अडचणीमुळे ऑटोमॅटिक पार्किंग सिस्टीम सतत सुरू झाली असावी. मात्र केवळ सीसीटीव्हीवरून हे सांगणं कठीण आहे. त्यासाठी कारच्या सिस्टीम लॉगची तपासणी गरजेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here