Home ताज्या घडामोडी काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस

काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस

0
काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस
काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई (सचिन धानजी): मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे पसरले असून या मेट्रो रेल्वेचा पसारा वाढू लागल्यानंतर यासाठीचा सेस आता लागू केला जात आहे. मुंबई महापालिकेला याप्रकारचा 1 टक्का मेट्रो उपकर भरण्याची वेळ आली आहे. भायखळा काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल नं 2 आणि 3 मधील सुमारे 34, 584. 34 चौ. मी क्षेत्रफळ जमीन मनोरंजनाचे मैदान तथा टेक्सटाईल म्यूझियम या सार्वजनिक कारणास्तव महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्याच्या दस्तऐवजावर 1 टक्के मेट्रो उपकराचे अधिदान महापालिकेला करावे लागणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/22/treatment-for-patients-at-bhagwati-hospital-to-begin-in-june/

काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल नं 2 आणि 3 म्हणून ओळखली जाणाऱ्या जुनी व बंद पडलेली गिरणीच्या एकूण 64, 947. 34 चौ.मी. क्षेत्र पैकी 61, 056. 89 चौ. मी. क्षेत्राचा भूखंड राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) यांनी मंजूर विकास नियंत्रण नियमावली- 1991 च्या विनियम 58 च्या तरतुदीनुसार महानगरपालिकेला मनोरंजन मैदानाकरिता 07 जानेवारी 2009 रोजी आगाऊ ताबा दिला गेला. त्यानंतर नगर विकास खात्याने 29 डिसेंबर 2016 अधिसूचनेनुसार एकूण क्षेत्रफळाच्या 61, 056. 89 चौरस मीटरपैकी 44,000 चौरस मीटर जमिनीवर मनोरंजनाचे मैदान तथा टेक्सटाईल म्यूझियम’ या सार्वजनिक उद्दिष्टाकरिता आरक्षित ठेवावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील ‘मनोरंजनाचे मैदान तथा टेक्सटाईल म्यूझियम’ करीता आरक्षित टप्प्याटप्याने टेक्सटाईल म्यूझियमचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

https://www.prahaar.in/2026/11/22/bmcs-significant-decision-to-lock-drain-covers-using-chains/

या जमिन हस्तांतरण दस्तऐवजाच्या अनुषंगाने मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने 02 एप्रिल 2024 रोजी एनटीसी यांना मुद्रांक शुल्कापोटी 16.12 कोटी रुपये एवढ्या रकमेची भरण्याबाबत मागणी केली. हा मुद्रांक शुल्क भरण्यास राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) हरकत दर्शविल्यामुळे, याच्या हस्तांतरण दस्तऐवजाची नोंदणी झाली नाही. त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयासमवेत झालेल्या चर्चेत महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचा यांच्या आदेशान्वये 31 ऑक्टोबर 2003, सार्वजनिक सुविधेसाठी हस्तांतरणीय विकास हक्क तथा चटईक्षेत्र निर्देशांकाच्या मोबदल्यात स्थानिक प्राधिकरणास विनामूल्य स्थावर मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या विशिष्ट प्रकरणांत मुद्रांक शुल्क माफ करण्याची तरतूद असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.

तरीही, या दस्तऐवजावर लागू होणाऱ्या 1 टक्के मेट्रो उपकरातून सूट देण्यासाठी नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांची पूर्वमान्यता आवश्यक असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले. त्यानुसार मा. महानगरपालिका आयुक्त यांनी 13 जानेवारी 2026 अन्वये 1 टक्के मेट्रो उपकरातून सूट मिळण्याबाबत नगर विकास विभागास पत्र पाठविले आहे. पण, त्यांचे निर्देश तथा अभिप्राय प्राप्त  झालेले नाही.

https://www.prahaar.in/2026/11/21/book-festival-to-be-held-in-mumbai-from-november-2-to-be-inaugurated-by-the-chief-minister/

याप्रकरणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार. महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणात टेक्सटाईल म्यूझियमच्या बांधकामासाठी सीएसआर माध्यमातून मे. जेएसडब्ल्यू यांना नियुक्त केले आहे व त्याकरिताचा खर्चाचा बोजा महानगरपालिकेच्या कोषावर येणार नाही, तसेच 1 टक्के मेट्रो उपकर अधिदानाचा परतावा येत्या काळात शासनाच्या मंजुरीसापेक्ष महानगरपालिकेस होणार असल्याने सदर 1 टक्के मेट्रो उपकराची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या कराची रक्कम अर्थसंकल्पातील तरतुदीतून देण्यात येणार आहे. यासाठी मेट्रोचा एक टक्का उपकर म्हणून 3.17 कोटी रुपये देण्यात येणार आहे आणि याचे अधिदान मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी यांना करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here