Home ब्रेकिंग न्यूज Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणार

Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणार

0
Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणार
(Photo: Social Media)

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी शहरांसह उपनगरांतील डांबरी रस्त्यांसह जुन्या रस्त्यांचा विकास करून त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. परंतु मुंबई शहरातील जी उत्तर विभागातील धारावीचा विकास केला जाणार असल्याने येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात नसून येथील रस्ते अद्यापही डांबरी असल्याने पावसाळ्यात येथील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने या रस्त्यांचा विकास आता मास्टिक अस्फाल्टद्वारे केला जाणार आहे. यासाठी या भागातील रस्त्यांचा विकास मास्टिक अस्फाल्टद्वारे करण्यासाठी 2.60 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

महापालिकेच्या ‘जी/उत्तर’ प्रभागातील धारावी येथील विविध रस्ते आणि चौकांची अर्थात जंक्शनची पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मास्टिक अस्फाल्टचा वापर करून खड्डे पडलेले तथा खराब रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील लहान तथा मोठ्या रस्त्यांवर खड्डे भरण्याची कामे पावसाळ्यात दरवर्षी केली जातात. खड्डयांचे प्रमाण पावसाळ्यात कमी व्हावे म्हणून पावसाळा पूर्वी, पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय म्हणून रस्त्यांच्या ठराविक निर्देशित केलेल्या ठिकाणांची पाहणी करुन खड्डे बुजविण्याची कामे प्रशासन हाती घेत आहेत.(Dharavi Roads)

https://www.prahaar.in/2026/11/22/treatment-for-patients-at-bhagwati-hospital-to-begin-in-june/

महाराष्ट्र शासनामार्फत धारावी करिता ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ राबविण्यात येत असून त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करीत आहेत. धारावीतील रस्त्यांच्या सुधारणेबाबत महापालिका व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या मध्ये झालेल्या पत्र व्यवहारातून असे निष्पण झाले की धारावीतील रस्ते ही नवीन आराखड्यानुसार बांधण्यात येणार आहेत. नवीन आराखड्यानुसार सध्याची रस्त्यांची रचना बदलली जाणार असल्यामुळे महापालिकेमार्फत धारावीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण अथवा नवीन बांधणी गेल्या काही वर्षात करण्यात आलेली नाही.(Dharavi Development)

https://www.prahaar.in/2026/11/22/bmcs-significant-decision-to-lock-drain-covers-using-chains/

यावर्षी शहर विभागातील झोन-2 अंतर्गत एफ/उत्तर, एफ/दक्षिण, जी/उत्तर, जी/दक्षिण प्रभागातील विविध रस्ते आणि चौकामध्ये (जंक्शन) पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मास्टिक अरफाल्टचा खड्डे/खराब रस्ते दुरुस्त करण्याचे काम 9 मी पेक्षा जास्त रुंद रस्त्यांकरिता मानष कन्स्ट्रकशन व 9 मी पेक्षा कमी रुंद रस्त्याकरिता व्ही. जे. कार्पोरेशन कंपनीला देण्यात आले. परंतु रस्त्यांची रचना बदलणार असल्यामुळे गेल्या काही वर्षात महापालिकेमार्फत धारावीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण अथवा नवीन बांधणी करण्यात आली नसल्यामुळे यावर्षी धारवीमध्ये खड्डयाची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली.

याबाबत नागरिकांच्या, स्थानिक आमदार व नगरसेवकांच्या विविध प्रकारे तक्रारी प्राप्त झाल्या. खड्ड्यांची संख्या व गणेशोत्सव अशी एकंदरीत परिस्थिती अंदाजित किंमतीचे प्रमाण पाहता याचे प्रमाण खुपच अपुरे असल्यामुळे, जी/उत्तर विभाग अंतर्गत फक्त धारावी येथील खड्‌डे बुजविण्यासाठी एक स्वतंत्र निविदा मागवून काम हाती घेण्यात आले. या निविदेतव्ही. जे. कार्पोरेशन यांची निवड करण्यात आली असून या कंपनीने उणे 36.99 टक्के दराने बोली लावत काम मिळवले. यासाठी 2.60 कोटी रुपये हे खड्डे तसेच खराब रस्ते दुरुस्त करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत.(Fix Dharavi Roads)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here