Home क्राईम Haryana Dowry Case: ९.५ लाखांची कार नाकारली, १३ लाखांची ब्रेझा मागितली; कार न मिळाल्याने लग्न मोडलं

Haryana Dowry Case: ९.५ लाखांची कार नाकारली, १३ लाखांची ब्रेझा मागितली; कार न मिळाल्याने लग्न मोडलं

0
Haryana Dowry Case: ९.५ लाखांची कार नाकारली, १३ लाखांची ब्रेझा मागितली; कार न मिळाल्याने लग्न मोडलं
AI Generated Image

हरियाणाच्या सोनिपतमध्ये नवरदेवाने मारुती ब्रेझा कारची मागणी पूर्ण न झाल्याने ठरलेलं लग्न मोडल्याची घटना घडली. ही घटना २० नोव्हेंबर रोजी सोनिपत येथील मामचंद वाटिका येथे घडली. वधूचे वडील सुभाष कुमार यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या कुलदीपने वधूच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी आधीच बुक केलेल्या अंदाजे ९.५ लाख रुपये किंमतीच्या ह्युंदाई ऑरा गाडीऐवजी सुमारे १३ लाख रुपये किंमतीच्या ब्रेझा गाडीचा आग्रह धरला.

वधूच्या कुटुंबीयांनी वर आणि त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी लग्नाच्या तयारीवर २५ ते ३० लाख रुपये खर्च केले आहेत. तक्रारीनुसार, सुभाषने सुमारे सहा महिन्यांपूर्वी आपली मुलगी हीनाचे लग्न कुलदीपसोबत ठरवले होते. हे लग्न २० नोव्हेंबरला होणार होते. वडिलांनी असा आरोप केला आहे की, लग्न ठरल्यानंतर वराकडून गाडी आणि दागिन्यांची मागणी सुरू झाली होती.

https://www.prahaar.in/2026/11/22/major-fire-breaks-out-in-a-building-at-mumbai-central-8-people-rescued-safely-a-fire-officer-injured/

सुभाष यांनी दावा केला की त्याने नवरदेवासाठी सुमारे ९.५ लाख रुपयांची गाडी आधीच बुक केली होती. मात्र लग्नाच्या एक दिवस आधी त्याला मध्यस्थांमार्फत कळले की कुलदीप त्या गाडीवर समाधानी नव्हता आणि त्याला त्याऐवजी मारुती ब्रेझा हवी होती. यानंतर कुटुंबाने आधीचे बुकिंग रद्द केले आणि ब्रेझा गांड शोधायला सुरुवात केली. मात्र लग्न अगदी जवळ आल्याने त्यांना वेळेवर गाडीची व्यवस्था करता आली नाही. वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागितलेल्या ब्रेझाची किंमत अंदाजे १३ लाख रुपये होती. हे आरोप केवळ गाडीपुरते मर्यादित नव्हते. सुभाष यांनी दावा केला की, त्यांच्या कुटुंबाने नवरदेवासाठी दोन तोळे सोन्याची साखळी, त्याच्या आईसाठी चार तोळे सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण देण्याचे मान्य केले होते. त्याने पुढे असाही आरोप केला की, नवरदेवाच्या मोठ्या भावासाठी आणि वाहिनीसाठीही दागिन्यांची मागणी करण्यात आली होती, ज्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी दागिन्यांची ऑर्डरही दिली होती.

लग्नासाठी फर्निचर आणि इतर घरगुती वस्तूंचीही व्यवस्था करण्यात आली होती, वडिलांच्या म्हणण्यानुसार केवळ फर्निचरवरच सुमारे १.३२ लाख रुपये खर्च आला. लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबीयांनी मामचंद वाटिका येथे सुमारे १२०० पाहुण्यांसाठी जेवणासह विस्तृत व्यवस्था केली होती. मात्र पूर्ण वरात घेऊन येण्याऐवजी कुलदीप आपल्या आईसोबत साध्या कपड्यांत त्या ठिकाणी पोहोचला आणि ब्रेझा शोधू लागला. जेव्हा वाहन सापडले नाही तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला.

https://www.prahaar.in/2026/11/22/gaurav-khannas-statement-on-his-relationship-with-akanksha-chamola-emphasizes-the-stability-that-marriage-brings/

सुभाष यांनी आरोप केला आहे की, नवरदेवाने वधूच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि हिनाचा भाऊ साहिल याच्याशी त्याचा वाद झाला. त्याने दावा केला की, नातेवाईकांनी कुलदीप आणि त्याच्या आईला लग्नाचे विधी पूर्ण करण्यासाठी वारंवार हात जोडून विनंती केली, पण त्यांनी नकार दिला आणि अखेरीस ते निघून गेले. दरम्यान, वधू आपल्या लग्नाच्या पोशाखात मंडपात बसून परत न आलेल्या वराची वाट पाहत राहिली. वर निघून गेल्यानंतर वधूच्या बाजूचे अनेक पाहुणेही जेवण न करताच निघून गेले, ज्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक नुकसानीत आणि अपमानात भर पडली. घटनेनंतर दोन्ही बाजूंनी डायल ११२ द्वारे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सुभाषने कुलदीप आणि त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here