Kartik Aaryan Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 36 वा वाढदिवस आज, 22 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या खास प्रसंगी कार्तिकने चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज ठेवले आहे. कार्तिकने आपल्या आगामी ‘कालिया’ चित्रपटाची घोषणा केली आहे. हा एक मॉन्स्टर थ्रिलर चित्रपट असून, याची निर्मिती करण जोहरने केली आहे. कार्तिक आता बॉलिवूड निर्माता बनला असून, करण जोहरसोबत एक नवीन उपक्रम त्याने सुरू केला आहे. कार्तिकने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा आज वाढदिवसाच्या दिवशी केली आहे, या चित्रपटाचा टीझर त्याने प्रदर्शित केला आहे.
कार्तिक आर्यनचा ‘कालिया’ हा नवीन चित्रपट भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांवर आधारित आहे. दिग्दर्शक म्हणून संदीप मोदी यांचा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट असणार आहे. यापूर्वी त्यांनी ‘द नाईट मॅनेजर’ आणि ‘आर्या’ यांसारख्या लोकप्रिय वेब सीरिजवर काम केले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/22/gaurav-khannas-statement-on-his-relationship-with-akanksha-chamola-emphasizes-the-stability-that-marriage-brings/
भारतीय लोककथांवरून ‘कालिया‘ हा चित्रपट प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात केवळ नेहमीच्या मॉन्स्टर चित्रपटांमधील दहशतच नसेल, तर प्राचीन भारतीय कथा, श्रद्धा आणि संस्कृतीच्या जगाचाही वेध घेतला जाणार आहे. निर्मात्यांनी ही कथा भगवान श्री कृष्णाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. टीझरमध्ये असे दाखवले आहे की, कृष्णाने हद्दपार केलेल्या व्यक्तीला मानवांनी परत आणले आहे.
View this post on Instagram
हा चित्रपटात कार्तिक आर्यन साठी खूप वेगळा ठरणार आहे. कारण एक निर्माता त्याचा नवीन दृष्टिकोन तसेच त्याचे अभिनय कौशल्य या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याआधी विविध प्रकारच्या भूमिका साकारलेल्या कार्तिकला आता एका अनोख्या कथेत आणि नवीन प्रकारात तो दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि कार्तिक आर्यनच्या नवीन निर्मिती कंपनी, डोपामाइन स्टुडिओजद्वारे केली जात आहे. ‘कालिया’ 5 मे 2028 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाव्यतिरिक्त, कार्तिक आर्यन करण जोहरसोबत आणखी एका चित्रपटावर काम करत आहे. त्याचा ‘नागझिला’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन ‘फुकरा’चे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा हे करत आहेत. या चित्रपटांव्यतिरिक्त, कार्तिककडे अनुराग बसू यांचा एक संगीतप्रधान रोमँटिक चित्रपटही आहे, ज्यात श्रीलीला मुख्य भूमिकेत आहे. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही चर्चा सुरू आहे. याशिवाय कालिया या चित्रपटाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत.