Home महाराष्ट्र नवी मुंबई Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

0
Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 22/23 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 28/29 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दररोज रात्री 1.50 ते पहाटे 4.05 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या नियोजित ठिकाणी थांबवण्यात येणार असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गातही बदल करण्यात आला आहे.

कोणत्या मार्गांवर ब्लॉक?

पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामात अडथळा ठरणारे घटक हटवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये कर्जत अप आणि डाऊन मार्ग, दिवा-वसई-रोहा-पनवेल विभागातील रेल्वेमार्ग आणि पनवेल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 यांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे पनवेल येथे कोचिंग सुविधा, रेल्वे देखभाल व्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. मात्र, संपूर्ण कोचिंग कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाल्यानंतरच या सुविधांचा पूर्ण लाभ मिळेल.

22/23 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाड्यांचे नियमन

  • गाडी क्रमांक 22193 दौंड-ग्वाल्हेर एक्सप्रेस पोयंजे (मोहोपे) येथे 45 मिनिटे थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू-CSMT एक्सप्रेस आपटा येथे 1 तास थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 20112 मडगाव-CSMT कोकण कन्या एक्सप्रेस सोमटणे येथे 10 मिनिटे थांबवण्यात येईल.

23/24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री बदल

  • गाडी क्रमांक 22114 तिरुवनंतपुरम-LTT सुपरफास्ट एक्सप्रेस आपटा येथे 2 तास थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू-CSMT एक्सप्रेस जीते येथे 1 तास थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 20112 कोकण कन्या एक्सप्रेस सोमटणे येथे 10 मिनिटे थांबवण्यात येईल.

याशिवाय गाडी क्रमांक 11099 LTT-मडगाव एक्सप्रेस 24 नोव्हेंबर रोजी LTT येथून पहाटे 4 वाजता सुटेल. या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

24/25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाड्यांवर परिणाम

  • गाडी क्रमांक 22149 एर्नाकुलम-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आपटा येथे 2 तास थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू-CSMT एक्सप्रेस जीते येथे 1 तास थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 20112 कोकण कन्या एक्सप्रेस सोमटणे येथे 10 मिनिटे थांबवण्यात येईल.

तसेच गाडी क्रमांक 11304 सोलापूर-LTT एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. ही गाडी कर्जत-कल्याण-ठाणे मार्गे चालवण्यात येईल. या गाडीला कल्याण स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे.

पुढील ब्लॉकची माहिती नंतर जाहीर होणार

25/26 नोव्हेंबर ते 28/29 नोव्हेंबर या कालावधीतील ब्लॉकमुळे रेल्वे सेवांवर होणाऱ्या परिणामांची माहिती मध्य रेल्वेकडून योग्य वेळी जाहीर केली जाणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here