मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता सदस्य त्यांच्या पीएफ अकाऊंट संबंधित सर्व तपशील त्वरित मिळवू शकत आहेत. EPFO ने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, केवळ 14 दिवसांमध्ये जवळपास 90 लाख सदस्यांनी EPFO च्या व्हॉट्सॲप सेवेद्वारे त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासली आहे. हे माध्यम केवळ त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लकेबद्दलच नव्हे, तर संस्थेशी संबंधित प्रत्येक अपडेटबद्दलही माहिती देणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/decline-in-gold-prices-why-did-the-price-of-gold-drop-by-10372-rupees-in-the-month-of-november-and-how-did-factor-from-the-us-contribute-to-this-decline/
EPFO च्या नवीन व्हॉट्सॲपच्या सेवेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांना 8796441800 या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करून तुम्ही माहिती मिळवू शकता. या क्रमांमकावर फक्त “Hi” असा साधा मेसेज टाईप करून तुम्ही तुम्हाला आवश्यक सर्व माहिती मिळवू शकणार आहात. आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम आणि शेवटचे पाच व्यवहार यांसारखी माहिती तुम्हाला या नंबरवरून त्वरित उपलब्ध होते. इतकेच नाही, तर या सेवेद्वारे पासबुक डाउनलोड करण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. EPFO ने सुरु केलेल्या व्हॉट्सॲप मेसेजच्या सेवेला नोकरदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फक्त 14 दिवसांमध्ये, 89.88 लाख नोकरदारांनी त्यांच्या पीएफ अकाऊंटची रक्कम तपासली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/be-careful-before-selling-old-gold-jewellery-keep-these-points-in-mind-to-ensure-you-get-a-fair-price-from-jewellers/
तुम्हाला सुद्धा तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती तपासायचीये का? जाणून घ्या स्टेप्स…
- 8796441800 ह्या EPFOच्या नंबरला सेव्ह करा.
- त्या नंबरवरून व्हॉट्सॲपवर ‘Hii’ करून पाठवा.
- त्यानंतर तुमच्याकडून मागितलेली माहिती तुम्हाला भरावी लागेल.
- UAN ला कनेक्ट असलेल्या नंबरवरूनच तुम्ही EPFOच्या नंबरवर मेसेज करा.
- व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमच्या पसंदीप्रमाणे सर्व्हिस निवडा.
- तुम्हाला PF Balance, Transaction किंवा Passbook डाऊनलोड करण्याचा पर्याय निवडू शकतो.
89.88 lakh members checked their EPF balance in just 14 days! 🚀
Your EPFO services are now just a WhatsApp message away! 💬Simply send a ‘Hi’ to +91 8796441800 and experience the convenience!
#EPFO #EPFOServicesOnWhatsApp https://t.co/8HXpGHMJvT— EPFO (@officialepfo) November 18, 2026
EPFOने शेअर केलेल्या व्हॉट्सॲपचा क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही EPFO सोबत संपर्क करु शकणार आहे, जाणून घ्या स्टेप्स
- सर्वात प्रथम EPFO ने दिलेल्या व्हॉट्सॲपच्या क्युआर कोडला स्कॅन करा.
- स्कॅन केल्यानंतर तुम्ही थेट EPFO च्या WhatsApp चॅनेलसोबत कनेक्ट व्हाल.
- EPFO च्या चॅटबॉटवर आल्यानंतर तुम्ही ‘Hi’ असा साधा मेसेज टाईप करुन पाठवा.
- त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या सोयीची भाषा निवडण्याचा पर्याय येईल.
- त्यानंतर, पीएफ शिल्लक, शेवटचे 5 व्यवहार, पासबुक डाउनलोड, भाषा बदल, असे चार पर्याय दिसतील.
- त्याप्रमाणे, तुमच्या गरजेनुसार सेवेची निवड करा.
- यानंतर तुम्हाला त्यासंबंधीचा तपशील मिळेल.
https://www.prahaar.in/2026/11/19/prime-minister-narendra-modi-links-indias-development-to-the-launch-of-gta-6-presents-an-overview-of-13-years-of-progress/
EPFO ने सुरू केलेली ही व्हॉट्सॲप सेवा तुम्हाला फक्त तुमची पीएफ शिल्लक तपासण्याचीच परवानगी देत नाही, तर तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांचा तपशीलही पुरवते. इतकेच नाही, तर केवळ एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून नोकरदार त्यांचे पीएफ खाते पासबुक डाउनलोड करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त, ह्या माध्यमातून EPFO कडून नोकरदारांना सर्व नवीनतम माहिती देखील पुरवणार आहे.