Home देश Yogi Aditynath : अखिलेश यांनी अयोध्येतून अर्ज भरला तर मीही मैदानात उतरणार; मुख्यमंत्री योगी यांचा पलटवार

Yogi Aditynath : अखिलेश यांनी अयोध्येतून अर्ज भरला तर मीही मैदानात उतरणार; मुख्यमंत्री योगी यांचा पलटवार

0
Yogi Aditynath : अखिलेश यांनी अयोध्येतून अर्ज भरला तर मीही मैदानात उतरणार; मुख्यमंत्री योगी यांचा पलटवार

उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilsh Yadav) यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी गुरुवारी सडेतोड उत्तर दिले. अखिलेश यादव अयोध्येतून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर आपणही त्यांच्या विरोधात त्याच जागेवरून अर्ज भरण्यास तयार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी ठामपणे सांगितले. गोरखपूर येथील एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अखिलेश यादव यांना थेट राजकीय लढाईसाठी पुढे येण्याचे आव्हान दिले. “अखिलेशजी, तुम्ही अयोध्येतून उमेदवारी अर्ज भरलात, तर मीही तिथूनच माझा उमेदवारी अर्ज दाखल करेन. लपूनछपून न राहता आता थेट आणि समोरासमोर लढत होऊनच जाऊ द्या,” असे योगी आदित्यनाथ सभेत म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/11/19/pm-modi-invokes-mahatma-gandhis-1930-message-on-self-reliance-says-previous-govts-bitter-experience-still-affects-industry/

अखिलेश यादव यांच्या राजकीय धैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना योगी म्हणाले की, त्यांच्याकडे समोरून येऊन लढण्याची हिंमतच नाही. जो माणूस आतून कमकुवत असतो, तोच नेहमी मागून वार करण्याचा प्रयत्न करतो, अशा शब्दांत त्यांनी यादव यांच्यावर जोरदार टीका केली. या भाषणादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणल्याचा आरोप केला. पूर्वीच्या काळात माफियांच्या मदतीने उत्तर प्रदेशला त्रास दिला गेला, तरुणांच्या नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी बाधित झाल्या, तसेच महिला आणि व्यापाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/19/prime-minister-narendra-modi-links-indias-development-to-the-launch-of-gta-6-presents-an-overview-of-13-years-of-progress/

समाजवादी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी गुंडगिरी, अराजकता, दंगली आणि वारंवार लागणारा कर्फ्यू या गोष्टींची तुलना थेट समाजवादी पक्षाशी केली. राज्यातील प्रत्येक गुंड आणि माफिया हा त्यांचा जवळचा साथीदार राहिला असून त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेसोबत विश्वासघात केला आहे, असा आरोप योगींनी केला. यापुढे कोणीही कायदा हातात घेण्याचा किंवा गुन्हेगारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायद्याचा कडक सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कुत्र्याचे शेपूट कधीच सरळ होत नाही, तशीच अवस्था गुंड आणि माफियांची

आपल्या सरकारच्या कडक भूमिकेचा पुनरुच्चार करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, “कोणीही पुन्हा माफियागिरी करण्याचे धाडस केल्यास त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही. कुत्र्याचे शेपूट कधीच सरळ होत नाही, तशीच अवस्था या गुंड आणि माफियांची आहे; कायद्याची जरब बसवल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत आणि आमचे सरकार हेच काम करत आहे. आम्ही यापूर्वीच त्यांची गुंडगिरी संपवली आहे आणि आता त्यांच्यावर पुन्हा एकदा अधिक कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here