Home क्रीडा IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सोपी नाही! कर्णधार शुभमन गिल असं का म्हणाला?

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सोपी नाही! कर्णधार शुभमन गिल असं का म्हणाला?

0
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सोपी नाही! कर्णधार शुभमन गिल असं का म्हणाला?
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सोपी नाही! कर्णधार शुभमन गिल असं का म्हणाला? (Photo: ANI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे. मालिकेतील पहिलाच सामना असल्याने भारतासाठी कठीण आव्हान असणा आहे. भारताने यापूर्वी टी20 आणि वनडे मालिका जिंकली आहे. त्यामुळे भारताचा न्यूझीलंड दौऱ्यात वरचष्मा दिसून आला आहे. तशीच काहीशी कामगिरी कसोटी मालिकेत अपेक्षित आहे. मात्र कसोटी मालिका भारतासाठी कठीण पेपर असल्याचं मत कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केलं आहे. शुभमन गिलने कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केलं आहे. शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध वनडेपेक्षा कसोटी खेळणं आव्हानात्मक आहे.

न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी आणि भिती!

कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केलेली भीती काही अंशी खरी आहे. कारण मागची आकडेवारी पाहता असं म्हणावं लागेल. भारताने न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तसेच दोन सामने ड्रॉ झाले आहेत. दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या मैदानात भारताने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. भारताने न्यूझीलंडविरुद्ध या मैदानात एक कसोटी सामना खेळला आणि त्यातही पराभवाचं तोंड पाहिलं आहे. शुभमन गिलने सांगितलं की, न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पात्र होण्याची संधी मिळेल.

https://www.prahaar.in/2026/11/16/in-the-syed-mushtaq-ali-trophy-match-against-gujarat-mumbai-captain-suryakumar-yadav-smashed-a-blistering-half-century/

न्यूझीलंडमधील खेळपट्टी आणि आव्हान

न्यूझीलंडच्या वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथील खेळपट्टी कायम वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली उसळी आणि चेंडू स्विंग होतो. त्यामुळे भारतीय फलंदाजांना या खेळपट्टीवर सामना करणं कठीण जाईल. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना नव्या चेंडूचा सामना करताना सांभाळून राहावं लागणार आहे. यासाठी भारतीय फलंदाज कसून सराव करत आहे. कर्णधार शुभमन गिलने यासाठी अतिरिक्त नेट सेशनमध्ये भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here