Home ताज्या घडामोडी Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

0
Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

Bread Poha Recipe: सकाळचा वेळ हा नोकरदार वर्गासाठी धावपळीचा असतो,अशावेळी झटपट पण तितकाच चवदार ऊर्जा टिकवून ठेवणारा नाश्ता काय बनवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत. सहसा अनेकजण नाश्ता पूर्णपणे वगळता किंवा घाईगडबडीत नाश्ता न करता तसेच घराबाहेर पडतात. दररोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर ब्रेड पोहा एकदा नक्की करून पहा.

अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते, ही झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ब्रेड पोहा कसा तयार करायचा ते पाहूया.(Easy Breakfast Recipe)

https://www.prahaar.in/2026/11/16/sanjay-kelkars-public-dialogue-jan-sanvad-sra-schemes-gas-pipeline-issues-and-land-plotting-fraud-citizens-voice-their-grievances-to-sanjay-kelkar/

साहित्य

ब्रेडचे 4 तुकडे (लहान तुकड्यांमध्ये कापलेले)
अर्धा कप भाजलेले शेंगदाणे
2 टेबलस्पून तेल
चवीनुसार हिंग
5-6 कढीपत्ताची पान
2 अख्ख्या लाल मिरच्या
1 कप उकडलेले वाटाणे
1 चमचा हळद पावडर
1 छोटा चमचा मीठ (चवीनुसार)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
1 मोठा चमचा लिंबाचा रस
1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेला नारळ (सजावटीसाठी)

ब्रेड पोहे कसे बनवायचे?

सर्वात आधी ब्रेड पोहे तयार करण्यासाठी एका पॅन किंवा कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात थोडे हिंग घाला. त्यानंतर गरम तेलामध्ये फोडणीसाठी त्यात मोहरी, कढीपत्ता आणि अख्ख्या लाल मिरच्या घालून काही सेकंद तडतडू द्या. त्यानंतर उकडलेले वाटाणे घाला. हलके परतून घ्या. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घालून चांगले मिसळा. आता हळद आणि मीठ घाला आणि त्यानंतर ब्रेडचे कापलेले तुकडे घालून सर्व व्यवस्थित एकत्र मिसळा. त्यानंतर प्लेटमध्ये ब्रेड पोहे घेऊन सजावटीसाठी किसलेला नारळ घाला. आणि सर्व्ह करा. (Healthy Breakfast Recipes)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here