Home देश Election 2027: पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला निवडणुकांचा धुरळा! उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यात होणार मतदान

Election 2027: पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला निवडणुकांचा धुरळा! उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यात होणार मतदान

0
Election 2027: पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला निवडणुकांचा धुरळा! उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यात होणार मतदान
Election 2027: पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला निवडणुकांचा धुरळा! उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यात होणार मतदान (Photo: @myogiadityanath Twitter)

वर्ष 2027 हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे. कारण या वर्षात सात राज्यात निवडणुका होणार आहे. पण वर्षाच्या सुरूवातीला पाच राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. तर वर्षाच्या शेवटी दोन राज्यात निवडणुका होतील. उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यात वर्षाच्या सुरूवातीलाच निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात आहे. या निवडणुका राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कल, नवी आघाड्या आणि 2029 लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्याचा प्रयत्न करतील.  2029 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राजकीय वातावरणाचा आणि पक्षांच्या ताकदीचा अंदाज या विधानसभा निवडणुकीतून मिळणार आहे. त्यामुळे जनादेशाचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. यात उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य असल्याने याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. तसं पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाचा वरचष्मा

उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात भाजपाची घट्ट पकड आहे. राज्यात तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी भाजपाचा तयारी सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना उत्तर प्रदेश निवडणुकीचा पेपर खूपच कठीण आहे. राज्यात विधानसभेच्या 403 जागा असून लोकसभेवर 80 खासदार निवडून जातात. त्यामुळे ही निवडणूक विधानसभेपुरता मर्यादीत नसून त्याचा राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम दिसून येईल. त्यामुळे भाजपाने आतापासून रणनिती आखण्यास सुरू केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणूक समन्वय, तिकीट वाटप, सोशल मीडिया रणनीती, विरोधी पक्षांच्या सार्वजनिक प्रसिद्धीच्या धोरणाला प्रत्युत्तर देणे या रणनितीवर काम सुरू झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप 256, समाजवादी पक्ष 100, अपना दल (एस) 13, राष्ट्रीय लोक दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 6, निषाद पार्टी 5, अपक्ष 3, काँग्रेस 2, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2 जागा आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/16/bjp-begins-preparations-for-uttar-pradesh-elections-2027-future-strategy-to-be-decided-at-a-meeting-in-mathura/

पंजाबमध्ये आपची सत्ता उलथणार!

पंजाबमध्ये आपची सत्ता असून भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत. पण राज्यात सत्ताविरोधी लाट, प्रादेशिक पक्ष आणि शेतकरी राजकारण या दृष्टिकोनातून निवडणुकीकडे पाहिले जाईल. त्यामुळे आपसाठी ही निवडणूक कठीण जाणार आहे. तर भाजपाने राज्यात निवडणुकीच्या दृष्टीने वेगाने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी राज्य जाहीरनामा समिती आणि राज्य आरोपपत्र समितीची स्थापना केली आहे.जाहीरनामा समितीत पंजाबचे माजी मंत्री, माजी आमदार, खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह एकूण 13 सदस्य आहेत. या समितीत मनप्रीत सिंग बादल, अश्वनी शर्मा, मनोरंजन कालिया, सोम प्रकाश, राणा गुरमीत सिंग सोधी, अश्वनी सेखरी, सतनाम सिंग संधू, राघव चढ्ढा, राजिंदर गुप्ता, हरभजन सिंग, परमपाल कौर आणि वकील एच.एस. फुलका यांचा समावेश आहे. आरोपपत्र समितीत पंजाब आणि राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी नेत्यांसह एकूण 14 सदस्य आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/15/preparations-for-assembly-elections-in-five-states-are-underway-the-election-commission-will-announce-the-dates-soon/

मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यात भाजपा सत्ता राखणार!

उत्तर प्रदेश आणि पंजाबनंतर मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्याकडे भाजपाचं लक्ष असणार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाची सत्ता आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आपल्या रणनितीला सुरूवात केली आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाच्या जोर बैठका सुरू आहेत. दुसरीकडे, मणिपूर आणि गोव्यामध्येही भाजपाने सत्ता परत आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, या तिन्ही राज्यात विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत कलह दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here