Home देश भाजपकडून राघव चड्ढांना मोठी जबाबदारी; पंजाब निवडणुकीच्या जाहीरनामा समितीत नियुक्ती

भाजपकडून राघव चड्ढांना मोठी जबाबदारी; पंजाब निवडणुकीच्या जाहीरनामा समितीत नियुक्ती

0
भाजपकडून राघव चड्ढांना मोठी जबाबदारी; पंजाब निवडणुकीच्या जाहीरनामा समितीत नियुक्ती
photo : ANI

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पंजाब भाजपच्या जाहीरनामा समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत ‘आप’ सोडलेल्या इतर पाच राज्यसभा खासदारांना पक्षाच्या जाहीरनामा आणि आरोपपत्र समित्यांवर स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी दोन राज्यस्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी समित्यांची घोषणा केली जाईल, असे ढिल्लन म्हणाले.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार अविनाश राय खन्ना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील. मनप्रीत सिंग बादल, अश्वनी शर्मा, मनोरंजन कालिया, सोम प्रकाश, राणा गुरमित सिंग सोधी, अश्वनी सेखरी, सतनाम सिंग संधू, राघव चड्ढा, राजिंदर गुप्ता, हरभजन सिंग, परमपाल कौर आणि एचएस फुलका हे त्याचे अन्य १२ सदस्य आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/16/central-government-job-opportunity-upsc-recruitment-for-13-group-a-posts-apply-online-by-4-december/

राज्य युनिटचे प्रमुख म्हणून केवल ढिल्लन यांचे पूर्ववर्ती माजी खासदार सुनील जाखड आरोपपत्र समितीचे अध्यक्ष असतील. इकबाल सिंग लालपुरा, विजय सांपला, श्वेत मलिक, प्रणित कौर, रवनीत सिंग बिट्टू, दिनेश बब्बू, सुशील रिंकू, गेज्जा राम, विक्रमजीत सिंग साहनी, अशोक मित्तल, संदीप पाठक, एसएस चन्नी आणि जगमीत सिंग ब्रार हे त्याचे अन्य १३ सदस्य आहेत. राघव चड्ढा, उद्योगपती राजिंदर गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हे जाहीरनामा समितीवर आहेत. तर संदीप पाठक आणि उद्योगपती अशोक मित्तल व विक्रमजीत सिंग सहानी हे आरोपपत्र समितीवर आहेत. ही समिती पंजाबमध्ये भाजपाची बाजू मांडण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here