Home ब्रेकिंग न्यूज पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

0
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी पुण्यातील दोन प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली यांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. तपासणीत शौचालयांजवळ अन्न साठवणूक, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि तयार खाद्यपदार्थांची अयोग्य हाताळणी यासह अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार खाद्यपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले जाते होते. तर इडली आणि डोशाचे पीठ उघड्या आणि अस्वच्छ ठिकाणी तयार केले जात होते.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने क्रॉस कंटॅमिनेशनच्या म्हणजेच पदार्थ एकमेकांत मिसळण्याच्या धोक्याकडेही लक्ष वेधले. कारण तयार खाद्यपदार्थांच्या थेट वर कच्च्या कापलेल्या भाज्या ठेवल्या जात होत्या. तसेच स्वयंपाकघरात कीटकरोधक दरवाजे नव्हते, असाही आरोप आहे. ‘तापमान निरीक्षणाच्या नोंदी आणि अद्ययावत पिण्याच्या पाण्याची चाचणी अहवाल उपलब्ध नव्हते. शिवाय तपासणीदरम्यान वैध FoSTaC – प्रशिक्षित अन्न व सुरक्षा पर्यवेक्षक उपस्थित नव्हता,’ असे सहायक आयुक्त  म्हणाले, ज्यांनी त्या आस्थापनांच्या अन्न व्यवसाय परवान्याच्या तात्काळ निलंबनाचे आदेश दिले.

https://www.prahaar.in/2026/11/14/a-major-blow-to-those-making-spam-calls-and-sending-spam-messages-over-1-24-lakh-numbers-shut-down/

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी हॉटेल रुपालीची पाहणी केली आणि स्वयंपाकघरातील परिस्थिती असुरक्षित असल्याचा अहवाल दिला. ‘स्वयंपाकघर उघडे आणि अपुरे सुरक्षित असल्याचे आढळून आले, ज्यामुळे अन्न तयार करण्याची जागा धूळ, घाण आणि कीटकांच्या संपर्कात येत होती. परिसरात पाणी साचणे, अपुरी स्वच्छता आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या अयोग्य पद्धती आढळून आल्या,’ असे एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार कच्चा माल, अर्ध प्रक्रिया केलेले अन्न आणि तयार खाद्यपदार्थ योग्य आवरण, लेबलिंग आणि वापरण्याची अंतिम तारीख या माहितीशिवाय साठवण्यात आले होते. याविरुद्ध एफडीएच्या पुणे विभागाने कडक कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here