Home ब्रेकिंग न्यूज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

0
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार
फोटो : X (Amit Shah)

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते भारत फोर्जच्या मुंढवा येथील प्रकल्पाला भेट देणार असून, सहकारी संस्थेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा औपचारिक शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘मराठा इतिहास – डिजिटल अभिलेखागार’चे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

15 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता शाह भारत फोर्ज लिमिटेडच्या मुंढवा औद्योगिक परिसरातील कॅम्पसला भेट देतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता तळेगाव दाभाडे येथील एनएचईसी प्रकल्पात बहुराज्य सहकारी संस्थेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा औपचारिक प्रारंभही यावेळी होईल.

https://www.prahaar.in/2026/11/13/h-v-seshadri-worked-to-provide-the-nation-with-disciplined-and-capable-citizens-prime-minister-narendra-modi/

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शाह पुणे येथील भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला आणि शांतिलाल मुथा फाउंडेशनच्या मुख्यालयाला भेट देतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12 वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ‘मराठा इतिहास – डिजिटल अभिलेखागार’चे लोकार्पण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here