Home ताज्या घडामोडी एनवीडियाच्या सीईओचा राजीनामा; नेमकं कारण काय?

एनवीडियाच्या सीईओचा राजीनामा; नेमकं कारण काय?

0
एनवीडियाच्या सीईओचा राजीनामा; नेमकं कारण काय?
एनवीडियाच्या सीईओचा राजीनामा; नेमकं कारण काय? फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: जागतिक पातळीवर खळबळ उडवून देणार्‍या एका मोठ्या बातमीमुळे, दिग्गज टेक कंपनी एनवीडियाचे (Nvidia) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टेक विश्वात या बातमीमुळे एकच खळबळ उडाली असून, यामागील कारणे अत्यंत धक्कादायक आणि गोपनीय आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/13/emails-couldnt-be-sent-meetings-got-stalled-work-disrupted-due-to-a-glitch-in-microsofts-servers/

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, जेन्सेन हुआंग यांचे नाव एलिस हुआंग नावाच्या एका चिनी व्यावसायिक महिलेशी जोडले गेले होते. अमेरिकन तपास यंत्रणा असलेल्या एफबीआईला (FBI) संशय आहे की, ही महिला बीजिंगसाठी काम करत असून ती एक चिनी गुप्तहेर (Chinese Spy) आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एनवीडियाच्या संचालक मंडळाने (Board) या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी सुरू केली आहे. जेन्सेन हुआंग यांना एखाद्या परदेशी गुप्तचर मोहिमेत लक्ष्य करण्यात आले होते का, याचा याद्वारे शोध घेतला जात आहे.

या अंतर्गत तपासामध्ये केवळ व्यावसायिक संबंधच नव्हे, तर जेन्सेन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासादरम्यान त्यांच्या आणखी दोन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सची माहिती समोर आली. या सर्व दबावानंतर हुआंग यांनी कंपनीला एक ईमेल पाठवून आपण आपल्या पत्नीला धोका दिल्याचे उघडपणे मान्य केले. जरी त्यांनी त्या ईमेलमध्ये इतर महिलांच्या नावांचा उल्लेख टाळला असला, तरी या वाढत्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विवादांमुळे अखेर त्यांना एनवीडियाच्या सीईओ पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/youth-dies-after-eating-explosive-mistaking-it-for-rasgulla-neighbor-kills-man-shocking-incident-in-madhya-pradesh/

चीनची संतप्त प्रतिक्रिया

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की, चीनवर किंवा चिनी नागरिकांवर लावले जाणारे ‘गुप्तहेर’ असण्याचे सर्व दावे पूर्णपणे निराधार आहेत. अमेरिका तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्यासाठी नवनवीन कारणं शोधत असून, त्यासाठी अशा प्रकारच्या काल्पनिक कथा रचल्या जात असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती ही केवळ नवीन शोध आणि खुल्या सहकार्याचा परिणाम आहे, असे सांगत बीजिंगने या वादात आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे तंत्रज्ञान जगतात मोठी खळबळ उडाली असून, एका बाजूला एनवीडियासारख्या महाकाय कंपनीतील नेतृत्वात झालेला बदल आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका- चीन यांच्यातील वाढता भू- राजकीय तणाव यामुळे येत्या काळात याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here