Home ब्रेकिंग न्यूज Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन

0
Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन Photo (x)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने पुन्हा वेग घेतला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून त्यांच्या पक्षातील आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फोनद्वारे विलिनीकरणाबाबत आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.

दोन्ही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि अलीकडील विधानांमुळे विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा चालना मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांनीही यासंदर्भात ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील’, असे सूचक विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातून पक्षातील आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षांतर्गत मत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/a-bus-carrying-pilgrims-headed-to-puri-meets-with-a-horrific-accident-several-passengers-injured/

काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे पटेल यांनी सांगितले होते. तसेच, रुग्णालयातून घरी परतल्यानंतर पार्थ पवार यांनीही ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट दीड तासांहून अधिक काळ चालली होती.

या घडामोडींमुळे दोन्ही गटांतील नेत्यांमधील संवाद वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन करून त्यांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाच्या चर्चेला नवे वळण मिळाले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे नेते पुढील काळात काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here