Home एक्सक्ल्युजिव्ह जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, बेपत्ता झालेल्या दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, बेपत्ता झालेल्या दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, गोळ्या झाडून हत्या

0
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, बेपत्ता झालेल्या दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) जवानांचे मृतदेह गुरुवारी दच्छन परिसरातील जंगलात आढळून आले. दोन्ही जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

जंगल परिसरात शोधमोहीम

बुधवारी किश्तवाड जिल्ह्यातील दच्छन परिसरातील उंच डोंगराळ आणि घनदाट जंगल असलेल्या भागातून दोन्ही SPO जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी व्यापक मोहीम हाती घेतली होती.या शोधमोहिमेत दुर्गम डोंगराळ भाग आणि जंगलांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली होती. जवानांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तसेच प्रशिक्षित श्वानपथकांचीही मदत घेण्यात आली.अखेर गुरुवारी शोधमोहिमेदरम्यान दच्छनच्या जंगलात दोन्ही जवानांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणाहून ते बेपत्ता झाले होते, त्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर त्यांचे मृतदेह सापडले. दोन्ही जवानांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक जखमा आढळल्या आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/12/in-mumbai-a-total-of-499-fire-incidents-occurred-over-five-days-as-many-as-333-of-these-were-caused-by-firecrackers/

बुधवारपासून होते बेपत्ता

मृत जवानांची नावे बाबी चंद आणि रशपाल कुमार अशी आहेत. बाबी चंद यांचे वय 57 वर्षे, तर रशपाल कुमार यांचे वय 45 वर्षे होते. दोघेही दच्छनमधील कियार गावात स्थानिक पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपमध्ये (SOG) तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोघेही आपल्या कॅम्पमधून धरना-मरवाह येथील लष्कराच्या चौकीकडे जात असताना बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळले.

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम

दोन्ही SPO जवानांच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. जंगल आणि दुर्गम डोंगराळ भागात तपासाचा विस्तार करण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.या घटनेमुळे किश्तवाड परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here