Home ब्रेकिंग न्यूज Matrubhumi Trailer : सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 4 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Matrubhumi Trailer : सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 4 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

0
Matrubhumi Trailer : सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 4 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Matrubhumi Trailer: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. खुद्द सलमान खानने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. ‘जो कल कर सके तो आज कर, आज करे तो अभी कर’, असे म्हणत त्याने चाहत्यांना चित्रपटाची झलक दाखवली. (Salman Khan)

सलमानने सोशल मीडियावर शेअर केला ट्रेलर

सलमान खानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतही अनेकदा बदल करण्यात आले. सुरुवातीला 10 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता सलमानने स्वतः ट्रेलर रिलीज करत चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. (Matrubhumi Movie)

4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता होती. मात्र, काही कारणांमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक चांगले करण्यासाठी निर्मात्यांना अतिरिक्त वेळ हवा होता. तसेच अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांना दुखापत झाल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला होता. (Salman Khan Latest Movie)

‘बॅटल ऑफ गलवान’ नावाबाबत सलमानने काय सांगितले होते?

यापूर्वी या चित्रपटाचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असल्याची चर्चा होती. मात्र, सलमान खानने या वृत्तांचे खंडन केले होते. ‘बॅटल ऑफ गलवान’ हे चित्रपटाचे अधिकृत नाव कधीच नव्हते. शूटिंगदरम्यान वापरल्या जाणाऱ्या क्लॅपसाठी हे नाव ठेवण्यात आले होते, असा खुलासा त्याने केला होता.

आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांना चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. 4 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here