Home ताज्या घडामोडी Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

0
Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

Ranveer Sinh: दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या घरी दुःखद घटना घडली आहे. एकीकडे दुसऱ्यांदा बाप झाल्याचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे रणवीर सिंगनं अत्यंत जवळची व्यक्ती गमावली. रणवीर सिंगचे आजोबा, म्हणजेच त्याच्या आईचे बाबा डॉ. राम हिंगोरानी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. दिवाळीच्या दिवशी, म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या त्यांचे कुटुंब दुःखात आहे. रणवीरची बहीण, सौम्या हिंगोरानी हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करून त्यांच्या निधनाची बातमी दिली. रणवीर सिंगने आपल्या आजोबांच्या निधनाबद्दल अद्याप सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही.

https://www.prahaar.in/2026/11/11/navi-mumbai-police-officer-struck-by-a-speeding-car-in-kalamboli-dragged-for-200-meters-the-driver-has-fled-and-the-cars-license-plate-turned-out-to-be-fake/

सौम्याची इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट
96 वर्षांचे चैतन्यमय आयुष्य. हे एक गौरवशाली जीवन आहे, ज्याचा आनंद साजरा करायला हवा, शोक नाही. माझे आजोबा, डॉ. राम, दिवाळीच्या दिवशी शांतपणे आम्हाला सोडून माझ्या आजीकडे (त्यांच्या जीवनसाथीकडे) निघून गेले. त्यांनी जाण्यासाठी यापेक्षा अधिक शुभ वेळ निवडलीच नसती. दिवसाची ती सुवर्णवेळ, लक्ष्मीपूजनाचा क्षण.

मला खात्री आहे की, ते दोघे आता आपापल्या खुर्च्यांत बसून, व्हिस्कीचा आस्वाद घेत, आम्हाला एकत्र आनंदाने पाहत असतील. जगातील सर्वोत्तम आजोबा असल्याबद्दल तुमचे आभार. आम्हाला सर्व काही दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी आईस्क्रीमचा एक स्कूप नक्की राखून ठेवा. पुन्हा भेट होईपर्यंत… पुन्हा एकत्र नाचूया. तसेच सोबत तिने त्यांच्यासोबतचे फोटोस शेयर केले आहेत.

 

रणवीरचे आजोबांसोबत नाते
रणवीर सिंग त्याच्या आजोबांच्या खूप जवळ होता. त्याने अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 2023 मध्ये, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, रणवीरने त्याच्या आजोबांचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याचे 93 वर्षीय आजोबा चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर डान्स करताना दिसत होते.

रणवीर सिंग  सध्या त्याच्या आगामी ‘प्रलय’ या चित्रपटाची तयारी करत आहे. जय मेहता दिग्दर्शित हा चित्रपट एक ‘सर्व्हायव्हल थ्रिलर’ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here