Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय? मग ‘ही’ ट्रिक वापरून काही सेकंदातच करा फ्री स्पेस
Gmail मध्ये असे अनेक जुने मेसेज असतात, ज्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ किंवा मोठे डॉक्युमेंट्स अटॅच केलेले असतात. हे शोधण्यासाठी जीमेलच्या सर्च बारमध्ये फाईल साईझनुसार फिल्टर वापरा. जुने आणि गरज नसलेले अटॅचमेंट्स असलेले ईमेल तपासून ते त्वरित डिलीट करा.न्यूजलेटर, ऑफर्स आणि सोशल मीडिया अलर्ट्समुळे इनबॉक्स झपाट्याने भरतो. Gmail मधील ‘Promotions’ आणि ‘Social’ टॅबमध्ये जाऊन जुने व उपयोगात नसलेले Email डिलिट करून टाका. शिवाय, वारंवार येणाऱ्या आणि गरज नसलेल्या न्यूजलेटरपासून सुटका मिळवण्यासाठी ‘Manage Subscriptions’ पर्यायाचा वापर करून Unsubscribe करा.केवळ Gmail नाही तर Google Drive मधील स्टोरेज सेक्शन उघडून जास्त स्टोरेज असलेल्या आणि नको असलेल्या फाईल्स सुद्धा डिलिट करा. Google Photos मधील जुने किंवा ड्युप्लिकेट फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा. नवीन फोटो अपलोड करताना ‘Storage Saver’ क्वालिटी निवडल्यास तुमच्या Google Storage ची मोठी बचत होते.आपण डिलीट केलेले Email थेट ‘Trash’ फोल्डरमध्ये राहतात, त्यामुळे सुद्धा Google Storage वाया जाते. शिवाय, ‘Spam’ फोल्डरमधील अनावश्यक मेसेज सुद्धा डिलीट करा. फोनमधील जीमेल ॲप उघडून प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि ‘Clean up space’ चा वापर करून एका क्लिकवर सर्व Data Clean करा.जर तुमचे जुने Email महत्त्वाचे असतील आणि तुम्हाला ते डिलीट करायचे नसतील, तर त्यांचा बॅकअप पीसी किंवा पेनड्राइव्हवर घेऊन नंतर गुगल अकाउंटवरून डिलिट करू शकता. या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तुम्ही तुमचे Google Storage कायम फ्री ठेवू शकता.