Home ब्रेकिंग न्यूज वेलची खाण्याचे 3 जबरदस्त फायदे! पचनापासून तोंडाच्या फोडांपर्यंत ठरते गुणकारी

वेलची खाण्याचे 3 जबरदस्त फायदे! पचनापासून तोंडाच्या फोडांपर्यंत ठरते गुणकारी

0
वेलची खाण्याचे 3 जबरदस्त फायदे! पचनापासून तोंडाच्या फोडांपर्यंत ठरते गुणकारी
वेलची खाण्याचे 3 जबरदस्त फायदे (Photo: AI Generated)

स्वयंपाकघरात वापरली जाणारी वेलची (इलायची) केवळ अन्नाची चव आणि सुवास वाढवण्याचे काम करत नाही, तर आरोग्यासाठीही ती अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये वेलचीला विशेष स्थान असून, पचनापासून ते तोंडाच्या फोडांपर्यंत अनेक आजारांवर ही औषधी ठरते. आपल्या आहारात वापरले जाणारे मसाले केवळ जेवणाची चवच फुलवत नाहीत, तर प्रकृती निरोगी ठेवण्यासाठीही मोलाची भूमिका बजावतात. यामध्ये सर्वात विश्वासू आणि सुवासिक मसाला म्हणून वेलचीकडे पाहिले जाते. वेलचीचे प्रामुख्याने हिरवी आणि काळी असे दोन प्रकार आहेत. हिरव्या वेलचीचा गोड, व सुवासिक स्वाद गोड व तिखट अशा दोन्ही पदार्थांमध्ये वापरला जातो, तर काळी वेलची तिच्या मसाल्यासारख्या आणि बोल्ड स्वादासाठी ओळखली जाते.

भारतात उगम पावलेली वेलची प्रामुख्याने पश्‍चिम घाटात उगवते. जागतिक स्तरावर ग्वाटेमाला हिरव्या वेलचीचे सर्वाधिक उत्पादन करते, तर नेपाळ काळ्या वेलचीचा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. याशिवाय भारत, भूतान, श्रीलंका, इंडोनेशिया आणि टांझानियामध्येही तिचे उत्पादन होते.

आयुर्वेदात वेलचीचे महत्त्व

आयुर्वेदानुसार, वेलची शरीरातील कफ आणि वात दोष संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस, मळमळ आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. तसेच श्वसनक्रिया उत्तम राखणे, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि मुत्रपिंडाचे आरोग्य जपण्यासाठी वेलची अत्यंत फायदेशीर मानली जाते. मुखाची दुर्गंधी दूर करून हिरड्या बळकट करण्याचे कामही ही मसाला करतो.

https://www.prahaar.in/2026/11/03/how-to-take-proper-care-of-your-lips-in-winter-check-out-these-tips/

आरोग्यासाठी 3 सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय

1. भूक वाढवण्यासाठी: जर भूक लावत नसेल, तर हिरवी वेलची बारीक पावडर करून किंवा तिच्या बियांचा थोडा अंश जेवणात किंवा अन्नात मिसळल्यास भूक वाढण्यास मदत होते. यासोबत वेलची आणि आल्याचा तुकडा एकत्र घेणे देखील फायदेशीर ठरते. दुधामध्ये चिमूटभर वेलची टाकल्याने दूध पचायला हलके होते आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढते.

2. लघवी करताना जळजळ झाल्यास: लघवी करताना तीव्र जळजळ होत असल्यास किंवा लघवी साफ होत नसल्यास, काही हिरव्या वेलचीच्या बिया चांगल्या बारीक करून घ्याव्यात. त्यात थोडे खडीसाखर मिसळून एक ग्लास पाण्यात हे मिश्रण ढवळून प्यावे. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास लघवीची समस्या दूर होण्यास मदत होते.

3. तोंड आले असल्यास (Mouth Ulcers): तोंडात चट्टे किंवा फोड आल्यास वेलची पावडरमध्ये थोडे मध मिसळून तयार केलेली पेस्ट प्रभावित भागावर लावावी. हा उपाय नियमित केल्यास तोंडाच्या फोडांपासून आराम मिळतो.

(टीप: प्रस्तुत लेखात दिलेली माहिती ही वाचकांच्या ज्ञानवर्धनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. यातील कोणत्याही दाव्यांची अथवा तथ्यांची पुष्टी ‘प्रहार’ करत नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here