पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली.




