Home ताज्या घडामोडी Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

0
Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात जाऊन, त्यांना मदत करून दिवाळी साजरी करत आहेत. तसेच शासनाच्या योजना, शासकीय मदत याबद्दल देखील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहेत. यातच आता भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील खांबांचा पाडा येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली.

दिवाळी मिलन या कार्यक्रमाचे वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि लोढा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरे मिल्क कॉलनीतील युनिट क्रमांक 25 मधील खांबांचा पाडा येथे मंत्री लोढा यांनी आदिवासी कुटुंबीयांशी संवाद साधत दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत साजरा केला. या उपक्रमांतर्गत लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू मुलांना दुरुस्ती करून वापरण्यायोग्य बनवलेल्या सायकली आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना दिवाळीचा फराळ, फटाके, बिस्किटे आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/11/08/government-schemes-for-tribal-communities-tribal-people-to-receive-immediate-benefits-under-one-roof-a-mega-event-for-government-schemes-to-be-held-in-the-presence-of-judges/

यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आरे कॉलनी परिसरात एकूण 27 आदिवासी पाडे आहेत. राज्याचा मंत्री आणि मुंबई उपनगराचा सहपालकमंत्री म्हणून या भागातील नागरिकांना आवश्यक असलेली कोणतीही मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

तसेच पुढे बोलताना, शहरातील नागरिकांकडून वापरात नसलेल्या वस्तू जमा करून लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर त्या सायकली आणि खेळणी यांसारख्या वस्तू गरजू मुलांपर्यंत पोहोचवल्या जातात. यापुढे असेच दरवर्षी वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव आतापर्यंतच्या सर्वांत खास दिवाळीच्या आठवणींपैकी एक असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या नृत्याचा उत्साह पाहून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही नृत्यात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्याचा आनंद घेतला. तसेच लहान मुलांसोबत फटाके फोडून आणि घरोघरी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांनी सणाचा आनंद द्विगुणित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here