Home क्राईम Mihir Shah Bail Rejected: मिहीर शाहचा जामीन रद्द; साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतरच जामीन अर्जावर विचार

Mihir Shah Bail Rejected: मिहीर शाहचा जामीन रद्द; साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतरच जामीन अर्जावर विचार

0
Mihir Shah Bail Rejected: मिहीर शाहचा जामीन रद्द; साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतरच जामीन अर्जावर विचार
photo: ANI

Mihir Shah Bail Rejected: पालघर येथील एका राजकारणी घरातील मुलगा मिहीर शाह याला 2024 च्या बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अभियोजन पक्षाला न्यायालयाने दिले आहेत.

नेमक प्रकरण काय?

मिहिरने 7 जुलै, 2024 रोजी, वरळीत आपली बीएमडब्ल्यू गाडी एका स्कूटरला धडकवल्याचा आरोप आहे, ज्यात स्कूटर चालवणारी व्यक्ती प्रदीप नखवा जखमी झाले. त्यांच्यासोबत मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कावेरी, गाडीच्या बोनेटवरून दीड किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मिहिर घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर त्याला दोन दिवसांनंतर, 9 जुलै 2024 रोजी अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी गाडीत असलेला त्याचा चालक, राजरुशी बिदावत याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. तर मिहीरने यापूर्वी दावा केला होता की, त्याची अटक बेकायदेशीर होती कारण “अटकेची कारणे कळवण्यात आली नव्हती.”

https://www.prahaar.in/2026/11/08/bigg-boss-20-salman-khan-silences-mahhi-vij-a-fitting-response-to-the-allegations-against-the-makers-of-bigg-boss/

मिहीर 2024 पासून तुरुंगात आहे. त्यामुळे त्याच्या वकिलाने जामिनाची मागणी केली. मात्र, सरकारी वकील अश्विनी रायकर यांनी या याचिकेला विरोध केला आणि असा युक्तिवाद करत, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या जामीन अर्जावर विचार केला जाऊ शकतो, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

मिहीरच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपीने “आधीच बराच मोठा काळ (एका वर्षापेक्षा जास्त) तुरुंगवास भोगला आहे आणि खटल्याची सुनावणी अद्याप ही सुरू झालेली नाही, तर दुसरीकडे 54 साक्षीदारांची तपासणी अजून करणे बाकी आहे. त्यामुळे खटल्याचा निकाल लागण्यास बराच वेळ लागेल.” तसेच शाह यांची “कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही” आणि ते मुंबईचे कायमचे रहिवासी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here