Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात घरात घुसून दोन बहिणींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री सेक्टर 1 मध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात तन्नू धोबी (20) गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर तिची मोठी बहीण रितू धोबी (22) हिच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ती बचावली. या प्रकरणी आरोपी अर्जुन चौहान याला पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले.
https://www.prahaar.in/2026/11/06/signs-of-discussion-again-between-america-and-iran-due-to-irans-7-issues-only-problem-remains/
आईसमोरच बहिणींवर गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बहिणी आपल्या आईसोबत घरी होत्या. त्यांचे वडील आणि भाऊ नितीन प्रदीप धोबी कामानिमित्त बाहेर गेले होते. याच वेळी अर्जुन चौहान घरात घुसला आणि दोन्ही बहिणींवर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
गोळीबारात तन्नूच्या पाठीला गोळी लागली, तर रितूच्या कानाला गोळी चाटून गेली. घटनेनंतर त्यांच्या आईने दोघींनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. तन्नूवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रितूवरही वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
ℕ𝔸𝕍𝕀 𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | GUNFIRE IN NAVI MUMBAI! TWO YOUNG WOMEN SHOT IN KOPARKHAIRANE MAIN ACCUSED ARRESTED, ACCOMPLICE ON THE RUN | A shocking shooting incident has rocked Koparkhairane, Navi Mumbai. Two young women were allegedly shot at in the SS-3 area of Sector 1, leaving both seriously injured.
One victim sustained a bullet injury near her ear, while the other was shot in the back. Both were rushed to a Navi Mumbai Municipal Corporation hospital for treatment.
In a swift police operation, Koparkhairane Police arrested the main accused, Arjun Chavan (22). However, his alleged accomplice, Rakesh Chavan, managed to escape and is currently on the run.
The motive behind the attack remains unclear, and police are investigating the case.
Two women shot in broad daylight how safe are our streets? The hunt is now on for the absconding accomplice! @Navimumpolice
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) November 5, 2026
प्रेमप्रकरणातून हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय
प्राथमिक तपासानुसार, या गोळीबारामागे प्रेमप्रकरणाचे कारण असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोपरखैराणे पोलिसांनी आरोपी अर्जुन चौहान याला घटनेच्या काही तासांत ताब्यात घेतले आहे.
गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र कुठून मिळवले, हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.