पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. तिथल्या नागरिकांनी पाकिस्तान सरकारविरुद्ध बंड पुकारलं आहे. आर्थिक अन्याय, राजकीय दडपशाही आणि त्यांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी होत असल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केला आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या भिकेला लागला आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर प्रचंड कराचे ओझे लादले गेले आहेत. इतकंच काय तर महागाईही प्रचंड वाढली आहे. दुसरीकडे, या भागात वीज निर्मिती होत असूनही नागरिकांना लोडशेंडिंग आणि अव्वाच्या सव्वा बिलांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे या भागात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन होत आहे. असं असताना रावलकोटमधील आंदोलन चिघळण्यासाठी पाकिस्तानी लष्काराने या भागात कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तान रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सने स्थानिक पोलिसांच्या दतीने आंदोलनाची ठिकाणं मोकळी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
पाकिस्तानी लष्काराच्या या कारवाईत बेछुट गोळीबार आणि ड्रोन बॉम्ब हल्ले केले जात असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्ल्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर 18 जण जखमी झाले आहेत. ही घटना रावलकोटमधील उमर फारूक चौकात घडली. लष्काराकडून पहाटे पाच वाजल्यापासून अमानुषपणे गोळीबार केला जात आहे.स्थानिकांच्या मते, पाकिस्तानी लष्कर जाणीवपूर्वक नागरिकांची घरं आणि नि:शस्त्र आंदोलकांना लक्ष्य करत आहे. जून 2026 पासून सुरू असलेल्या या कारवाईत पाकिस्तान लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील 153हून अधिक जणांना ठार केलं आहे.
November 5, 2026 | Rawalakot, POJK
Pakistan forces have launched drone strikes in Rawalakot, Kashmir.
All mobile networks and internet services have been completely shut down.
The city is gripped by fear and chaos, with dozens killed and injured. https://t.co/RQjdfqCtlR
— برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) November 5, 2026
https://www.prahaar.in/2026/11/05/in-kannauj-uttar-pradesh-a-husband-set-his-wife-on-fire-suspecting-her-of-infidelity/
रावलकोटमधील सरकारी मोबाईल सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून हल्ले होत असले तरी आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. उमर फारूक चौकात उपस्थित असलेल्या महिलांनी आपले आंदोलन सुरूच ठेवलं आहे. जीव गेला तरी जागा सोडणार असं भूमिका आंदोलक महिलांनी घेतली आहे.