Delhi: दिल्लीयेथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी दिल्ली येथील लव्हली हेरिटेज स्कूल या ठिकाणी शिकत होती. शाळेतील या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. परंतु, या मुलीच्या पालकांनी आरोप केला आहे की, तिला वेळेत CPR देण्यात आला नाही अंडी प्राथमिक उपचारही करण्यात आले नाहीत.
शाळेत एक 9 वर्षांची मुलगी शिकत होती. इयत्ता तिसरीतील ही विद्यार्थिनी खेळाच्या तासानंतर वर्गात परत आली आणि त्यानंतर थोड्याच वेळात कोसळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती वर्गात चालत येताना दिसत आहे, शिवाय कमरेभोवती दोन्ही हात ठेवताना आणि नंतर जमिनीवर कोसळताना दिसत आहे. त्यानंतर वर्गशिक्षिका तिच्याकडे धावली आणि पुढील मदत मागण्याआधी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु तिथे तिला दाखल करून घेण्यात आले नाही. यानंतर, तिला निर्माण विहार येथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शाळा प्रशासनाने हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे, परंतु मुलीच्या पालकांनी आपत्कालीन प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेच्या आधी मुलगी अगदी सामान्य दिसत होती. ती इतर मुलांसोबत इनडोअर एरियामध्ये खेळत होती, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
🚨 Mayur Vihar: 9 वर्षीय छात्रा की मौत
आज Lovely Public School, Mayur Vihar की Class III की 9 वर्षीय छात्रा अचानक classroom में गिर गई। उसे Malik Redix Health Care, Nirman Vihar ले जाया गया, जहां डॉक्टरों ने मृत घोषित किया।
#delhi #delhipolice #delhinews https://t.co/PgKQmeRbzf
— Harsh Pathak (@Harsh08__) November 4, 2026
https://www.prahaar.in/2026/11/05/shital-upare-actress-and-model-shital-upares-diwali-special-photoshoot/
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अज्ञात असले तरी, शाळा प्रशासनाने मुलीला हृदयविकाराचा झटका आला होता, असे स्पष्ट केले आहे. एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका येणे दुर्मिळ आहे. तसेच 9 वर्षांच्या मुलीच्या या मृत्यूमुळे शाळा प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.