Home देश Bengaluru Gas Cylinder Fire : …आणि अवघ्या काही सेकंदांत सिलिंडरने पेट घेतला, एक चूक महागात पडली, डिलिव्हरी कर्मचारी थोडक्यात बचावला

Bengaluru Gas Cylinder Fire : …आणि अवघ्या काही सेकंदांत सिलिंडरने पेट घेतला, एक चूक महागात पडली, डिलिव्हरी कर्मचारी थोडक्यात बचावला

0
Bengaluru Gas Cylinder Fire : …आणि अवघ्या काही सेकंदांत सिलिंडरने पेट घेतला, एक चूक महागात पडली, डिलिव्हरी कर्मचारी थोडक्यात बचावला
...आणि अवघ्या काही सेकंदांत सिलिंडरने पेट घेतला, एक चूक महागात पडली, डिलिव्हरी कर्मचारी थोडक्यात बचावला (Photo X)

Bengaluru Gas Cylinder Fire: बंगळूरच्या मल्लेश्वरम परिसरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू असताना अचानक आग लागल्याची घटना घडली. घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या पेटत्या दिव्याच्या संपर्कात गॅस आल्याने सिलिंडरने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सिलिंडर पोहोचवणारा डिलिव्हरी कर्मचारी सुदैवाने बचावला. आगीमुळे निर्माण झालेल्या घबराटीचे क्षण घराबाहेरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/04/government-of-maharashtra-special-drive-for-tribal-communities-to-facilitate-the-issuance-of-aadhaar-cards-and-birth-certificates/

गॅस गळतीमुळे अचानक लागली आग

मल्लेश्वरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. डिलिव्हरी कर्मचारी सिलिंडर घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एशियानेट न्यूजच्या वृत्तानुसार, सिलिंडरमधून गॅसची गळती होत होती. हा गॅस घराच्या दाराजवळ पेटवलेल्या तेलाच्या दिव्याच्या संपर्कात आल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

डिलिव्हरी कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखले

मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंडर येण्यापूर्वी घरातील रहिवाशांनी प्रवेशद्वार स्वच्छ करून पूजा केली होती. त्यानंतर उंबरठ्यावर पारंपरिक दिवा लावण्यात आला होता. डिलिव्हरी कर्मचारी सिलिंडर दाराजवळ ठेवत असताना गळणारा गॅस दिव्याच्या ज्योतीच्या संपर्कात आला आणि अचानक भडका उडाला.

आग लागल्यानंतर परिसरात घबराट पसरली. मात्र, डिलिव्हरी कर्मचाऱ्याने तातडीने बाजूला होत स्वतःचा बचाव केला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांकडून घटनेची पाहणी

घटनेची माहिती मिळताच मल्लेश्वरम पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली आणि आग लागण्यामागील परिस्थिती काय होती, याचा तपास केला जात आहे.

या घटनेमुळे घराबाहेर दिवे किंवा मेणबत्त्या पेटलेल्या असताना गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करताना विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here