Home ब्रेकिंग न्यूज Tiger Shroff News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने २२ वर्षीय महिलेला अटक केली; आरोपींच्या संख्येत वाढ

Tiger Shroff News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने २२ वर्षीय महिलेला अटक केली; आरोपींच्या संख्येत वाढ

0
Tiger Shroff News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने २२ वर्षीय महिलेला अटक केली; आरोपींच्या संख्येत वाढ
Photo: (ANI)

Tiger Shroff News : मुंबई क्राईम ब्रँचने बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात हरियाणातील कर्नाल येथून सुनेहा पंडित नावाच्या 22 वर्षीय महिलेला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिसांच्या मदतीने 1 नोव्हेंबर रोजी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

18ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफवर जुहू परिसरात हल्ला

मुंबईतील जुहू परिसरात 18 ऑक्टोबर 2026 रोजी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी दुचाकीवरून जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ फुटबॉलच्या मैदानावरून बाहेर पडत असताना त्याच्या गाडीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात पाच गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत अभिनेते टायगर श्रॉफ बचावले असला तरी, या हल्ल्यामध्ये एका चालक आणि नागरिक जखमी झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी तातडीने या संदर्भात तपास सुरू केला आहे. यापूर्वी 12 आरोपींना राजस्थानमधील कोटा, दिल्ली आणि हरियाणातील सोनीपत येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता 1 नोव्हेंबर 2026 रोजी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील शिव कॉलनीमधून सुनेहा पंडित (वय 22) या महिलेला अटक करण्यात आली. ही महत्वाची अपडेट समोर आली आहे. सदरच्या तपासात महिला आरोपीचा संघटित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. सदरच्या गोळीबार प्रकरणात 27 ऑक्टोबर रोजी मकोका कायदयाअंतर्गत कलमे वाढवण्यात आली आहेत. या नवीन अटकेमुळे अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. (Tiger Shroff Shooting Incident)

https://www.prahaar.in/2026/11/03/dia-mirza-should-not-be-the-one-to-teach-us-how-to-celebrate-diwali/

आरोपींची पार्श्वभूमी; 12 पैकी 9 आरोपी सोनीपत जिल्ह्यातील

मुंबई पोलिसांची एक टीम याआधी सोनिपतमध्ये तळ ठोकून होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखोडा भागातील रोहाना गावातून अमर नावाच्या तरुणाला अटक केली होती. आतापर्यंत अटक केलेल्या 12 आरोपींपैकी 9 आरोपी सोनीपतचेच असल्याचं तपासातून समोर आलं. पोलिस तपासात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर आले आहेत. खरखोडा भागातून अटक केलेला अमर हा यापूर्वी अटक झालेला आरोपी कुणालचा मित्र आणि शेजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. कुणालने अमरच्या खात्यात एकूण 40,000 रुपये पाठवले होते. मुख्यतः कुणालच्या सांगण्यावरूनच अमरने आरोपी राधाच्या खात्यात 12000 रुपये ट्रान्सफर केले. या बँक व्यवहारानंतरच पोलिसांना अमरपर्यंत पोहोचणे शक्य झाले. हा पैसा गोळीबाराच्या कटासाठी वापरला गेला का, याचा पुढील तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here