भारतीय ट्रेनचा नंबर हा एक फक्त नंबर नसतो तर एक प्रकारचा कोड असतो. ज्यावरून सगळी माहिती नागरिकांना मिळत असते. हा नागरिकांसाठी जरी एक नंबर असला तरी रेल्वे अधिकार्यांसाठी हा नंबर खूप महत्वाचा मानला जातो. या नंबर वरून ट्रेनची श्रेणी, ही ट्रेन कुठे जाणार आहे आणि कोणत्या दिशेने जाणार आहे याचा अंदाज येतो. हा नंबर मुळातच ५ अंकी असतो. त्यामुळे नागरिकांना ट्रेनबद्दल माहिती समजून घेण्यास खूप मदत होते.(INDIAN RAILWAYS)
कोणता नंबर काय सांगतो?
0 – स्पेशल ट्रेन
ट्रेन नंबरची सुरुवात शून्याने होत असेल, तर ती विशेष ट्रेन असण्याची शक्यता असते. उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव किंवा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अशा गाड्या चालवल्या जातात.
1 – लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेन
ट्रेन नंबरची सुरुवात 1 ने होत असेल, तर ती सामान्यतः लांब पल्ल्याची मेल किंवा एक्स्प्रेस श्रेणीतील ट्रेन असते. या गाड्यांमध्ये राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी, आणि वंदे भारत अशा गाड्यांचा समावेश असतो.
2 – लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेन
2 ने सुरू होणारे क्रमांकदेखील लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जातात. विशेषतः 1 ने सुरू होणाऱ्या क्रमांकांची मालिका उपलब्ध नसल्यास या अंकाचा वापर केला जातो. ज्या सुपरफास्ट आणि एक्सप्रेस गाड्या असतात त्यांचा समावेश देखील यामध्ये होतो.
3 – कोलकाता उपनगरीय लोकल
3 ने सुरू होणारे ट्रेन नंबर कोलकाता परिसरातील उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वापरले जातात.
4 – इतर शहरांमधील उपनगरीय रेल्वे
4 ने सुरू होणारे क्रमांक दिल्ली, चेन्नई, सिकंदराबाद आणि इतर महानगरांमधील उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वापरले जातात.
5 – पॅसेंजर ट्रेन
5 ने सुरू होणाऱ्या ट्रेन नंबरचा वापर पारंपरिक डब्यांच्या पॅसेंजर गाड्यांसाठी केला जातो.
6 आणि 7 – MEMU आणि DEMU ट्रेन
या क्रमांकांचा वापर MEMU आणि DEMU सेवांसाठी केला जातो. या गाड्या कमी आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी महत्त्वाच्या आहेत.
9 – मुंबईतील लोकल ट्रेन
मुंबईकरांसाठी हा अंक विशेष मानला जातो. 9 ने सुरू होणारे ट्रेन नंबर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांशी संबंधित असतो. यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध लोकल सेवांचा समावेश होतो.
https://www.prahaar.in/2026/11/03/pune-metro-enters-service-today-to-operate-across-17-stations-check-ticket-fares-and-the-timetable-here/
सुपरफास्ट एक्सप्रेस कशी ओळखायची?
या गाडयांना त्यांच्या नंबर वरून ओळखले जाते. नंबर जर 12xxx आणि 22xxx असेल तर त्या गाड्या या लांबपल्याचा असतात. आणि जर दुसऱ्या नंबरचा गाड्या असतील तर त्या वेगळ्या श्रेणीचा असतात. सुपरफास्ट गाड्यांमध्ये हि वेगवेगळा फरक जाणवतो.(TRAIN NUMBER DIGITS)
12301 ट्रेन का आहे खास ?
12301 ही ट्रेन नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस म्ह्णून खूप महत्वाची मानली जाते. हि भारतीय रेल्वेची एक अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ट्रेन आहे, जी कोलकाताला देशाची राजधानी नवी दिल्लीशी जोडते. या ट्रेनचे विशेष महत्व आहे. हि ट्रेन जाताना 12301 या नंबर ची असते पण जेव्हा ती येते तेव्हा तिचा नंबर हा 12301 असा असतो. अशा ट्रेनचे नंबर चेंज होता असतात.
सुरवातीचे अंक कोणता झोन दर्शवतात?
क्रमांकाचे सुरुवातीचे अंक हे देखील दर्शवतात की एखादी गाडी कोणत्या रेल्वे झोनशी किंवा झोनच्या समूहाशी संबंधित आहे. या कारणामुळे एकाच झोनमधील अनेक गाड्यांचे क्रमांक बऱ्याचदा सारखे दिसतात. नेमका झोन कोणता हे जाणून घेण्यासाठी अधिकृत यादी पाहणेच सर्वोत्तम ठरते.
https://www.prahaar.in/2026/11/03/panchkula-school-attack-case-a-new-turn-in-the-panchkula-attack-case-the-little-girls-uncle-reveals-shocking-details-behind-the-incident/
5 अंकी प्रणाली का स्वीकारण्यात आली ?
2010 मध्ये 5 अंकी प्रणाली स्वीकारण्यात आली. याआधी गाड्यांची ओळख 4 अंकी क्रमांकाने केली जायची. परंतु नंतर गाड्यांमध्ये वाढ झाली आणि श्रेणी कळावी यासाठी हा बदल करण्यात आला.(RAILWAY FACTS)
यात नागरिकांचा फायदा कसा झाला?
या नंबरवरून ही ट्रेन राजधानी आहे की सुपरफास्ट आहे हे समजते. नागरिकांना ट्रेन बद्दलची माहिती मिळते. ट्रेन कधी पोचणार आहे, कालावधी किती लागेल , किती रक्कमेत हा प्रवास होईल या सगळ्याची माहिती मिळते. रेल्वेविभाग या नंबरचा उपयोग बुकिंगसाठी करतो आणि इतर कामांसाठीही केला जातो.