Home साप्ताहिक अर्थविश्व SBI : एसबीआयचा दुसऱ्या तिमाहीत नफा 14 टक्क्यांनी वाढला

SBI : एसबीआयचा दुसऱ्या तिमाहीत नफा 14 टक्क्यांनी वाढला

0
SBI : एसबीआयचा दुसऱ्या तिमाहीत नफा 14 टक्क्यांनी वाढला

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने जुलै-सप्टेंबर २०२६ या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा १४ टक्क्यांहून अधिक वाढून २३,०३८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा २०,१६० कोटी रुपये होता. निव्वळ व्याज उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून ४९,१४३ कोटी रुपयांवर पोहोचले असून, गेल्या वर्षी ते ४२,८४७ कोटी रुपये होते. कर्जवाढ आणि व्याज उत्पन्नातील मजबुती हे निकालाचे मुख्य आधार ठरले.

https://www.prahaar.in/2026/11/03/rising-gold-prices-have-led-customers-to-turn-away-from-purchasing-gold/

या तिमाहीत बँकेला ७,२८८ कोटी रुपयांचा एकवेळचा नफा मिळाला आहे. एसबीआय म्युच्युअल फंड, तसेच इतर कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून हा नफा झाला. त्यामुळे एकूण नफ्याचा आकडा अधिक उंचावला आहे. दुसरीकडे, शुल्क आणि ट्रेझरीसह इतर उत्पन्न २४ टक्क्यांनी घटून ११,७७७ कोटी रुपये झाले आहे. एकूण उत्पन्न १,४३,७९६ कोटी रुपयांवर पोहोचले असून, गेल्या वर्षी ते १,३४,९७९ कोटी रुपये होते.

मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा दिसून आली आहे. ३० सप्टेंबर २०२६ अखेर एकूण थकित कर्जाचे प्रमाण १.३९ टक्क्यांवर आले असून, वर्षभरापूर्वी ते १.७३ टक्के होते. निकालानंतर शेअर बाजारात बँकेच्या शेअरमध्ये फारशी हालचाल दिसली नाही. गुंतवणूकदारांसाठी एकवेळचा नफा वगळता मूळ व्यवसायाची कामगिरी हाच खरा निकष ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here