Home Uncategorized महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

0
महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी
महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी फोटो सौजन्य: मंत्री प्रकाश आबिटकर (X Account)

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सामान्य, खेड्या पाड्यातील, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीला प्राधान्य दिले आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट-अ (S-20) गटातील 1 हजार 440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष समारंभ उद्या 4 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 674 विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि 766 एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला मोठे मनुष्यबळ मिळणार असून शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता दूर करण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकारकडून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/03/demand-for-5-tolas-of-gold-allegations-of-physical-abuse-29-year-old-daughter-in-law-dies-under-suspicious-circumstances-in-pune/

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांतील डॉक्टरांची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून ते गंभीर आजारांपर्यंतच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही भरती महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण 2 हजार 514 पदांपैकी 1 हजार 440 पदांसाठी 27 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत 674 विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि 766 एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी अशा एकूण 1 हजार 440 पदांचा समावेश आहे.

ग्रामीण रुग्णालयांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत विशेषज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्यांमुळे नागरिकांना सुरळित उपचार मिळेल. तर एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर शासकीय आरोग्य संस्थांमधील नियमित रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल. या नियुक्त्यांचा सर्वाधिक फायदा ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातील नागरिकांना होणार आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागते. डॉक्टरांची उपलब्धता वाढल्याने स्थानिक पातळीवरच तपासणी, निदान आणि उपचार मिळण्यास मदत होईल. अपघात, प्रसूती, सर्पदंश, संसर्गजन्य आजार तसेच अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये वेळेवर उपचार मिळणे शक्य होईल. माता व बाल आरोग्य सेवा, नियमित आरोग्य तपासणी, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार अशा विविध सेवांना अधिक गती मिळेल.

https://www.prahaar.in/2026/11/03/additional-funds-will-be-raised-through-the-participation-of-companies-organizations-and-generous-individuals-the-chief-ministers-relief-fund-will-be-strengthened-by-social-participation/

वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांवरील कामाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल. रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आंतररुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता निर्माण होईल. विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या शहरांतील रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. शासकीय आरोग्य संस्थांमधील उपचारांची गुणवत्ता आणि नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढविण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ‘सुदृढ नागरिक, सक्षम आरोग्य व्यवस्था आणि प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा’ या उद्दिष्टाच्या दिशेने 1 हजार 440 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे नवी गती मिळणार आहे. “राज्यातील गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, हा शासनाचा मानस आहे. 1 हजार 440 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होऊन खेड्या पाड्यातील, दुर्गम आणि आदिवासी जनतेला वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. नवनियुक्त डॉक्टरांनी सेवाभाव आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन ठेवून काम करावे.” अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here