बांगलादेश गेल्या काही वर्षात अशांत असून त्याची धग पुन्हा एकदा दिसून आली. जवळपास 28 महिन्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर जाळपोळ आणि दगडफेकीचं चित्र दिसलं.वस्त्रोद्योग कामगारांनी कमी वेतनाचा मुद्दा पकडून सरकारवर दबाव आणला आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी या आंदोलनाला सुरूवात झाली आणि त्याची धग अजूनही कायम आहे. या उग्र आंदोलनामुळे काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. यात पोलीस चौक्या, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. पण हिंसक आंदोलकांनी आपली मागणी जोरकसपणे मांडत ढाका, आशुलिया, सावर आणि गाझीपूर यासारख्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते अडवले. तसेच कपड्याचे कारखाने बंद पाडले. या आंदोलन आणि संपामुळे अंदाजे 529 कारखाने आणि जवळपास 10 लाख कामगारांवर परिणाम झाला आहे.
वेतन निश्चितीसाठी मंडळाची स्थापना
बांगलादेश सरकारने रविवारी सहा सदस्यांचे वेतन मंडळ स्थापन केलं आहे. या मंडळाचे काम वस्त्रोद्योग कारखान्यातील कामगारांचे नवीन किमान वेतन निश्चित करणे आहे. दुसरीकडे, या मंडळाच्या स्थापनेने कामगारांच्या समस्या सुटणार नाहीत, असं कामगार नेत्यांचे म्हणणं आहे. कमी वेतन, कामाची वाईट परिस्थिती, वेतनवाढीची मागणी आणि कारखान्यांचे संप यांसारख्या समस्या सामान्य असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आवामी लीगशी संबंधित काही कारखानदार वस्त्रोद्योगात अस्थिरता निर्माण करत आहेत, असा आरोप केला जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/02/they-used-to-prevent-kanwar-yatras-in-western-up-cm-yogi-lashes-out-at-akhilesh-yadav-and-samajwadi-party2026/
बांगलादेशमधील कामगारांची काय स्थिती?
आंदोलक 30 हजार टाका मासिक वेतनाची मागणी करत आहेत. सध्याच्या पगाराच्या दुप्पट ही मागणी केली जात आहे. भारतीय चलनात ही रक्कम 23 हजार रुपये इतकी होता. सध्या बांगलादेशातील कामगारांना दरमहा सुमारे 13 हजार टाका मिळतात. वस्त्रोद्योग हा बांगलादेशातील अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. देशातील सर्वात मोठ्या निर्यात उद्योगापैकी एक असून परकीय चलनाचा मुख्य स्रोत आहे. युरोप अमेरिकेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये बांगलादेशातील कपड्यांना मोठी मागणीआहे. त्यामुळे या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळतो.