Home देश SWAYAM July 2026 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! स्वयं परीक्षेची नोंदणी मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत आजच करा अर्ज

SWAYAM July 2026 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! स्वयं परीक्षेची नोंदणी मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत आजच करा अर्ज

0
SWAYAM July 2026 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! स्वयं परीक्षेची नोंदणी मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत आजच करा अर्ज
Photo: AI Generated

SWAYAM July 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स (स्वयम्) जुलै सत्र 2026 परीक्षेसाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. स्वयं जुलै सत्र परीक्षा २०२६ची नोंदणीची अंतिम मुदत वाढवून ते आता 5 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.

स्वयं जुलै 2026 सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने 31 ऑक्टोबर निश्चित केली होती , परंतु आता ती 5 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:50) पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करायची असेल त्यासाठी अर्ज कसा करायचा ते आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान, अर्जातील दुरुस्तीची विंडो 6 नोव्हेंबर 2026 रोजी उघडेल. ज्या उमेदवारांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही, ते आता exams.nta.nic.in/swayam या अधिकृत पोर्टलद्वारे आपला अर्ज सादर करू शकतात .

https://www.prahaar.in/2026/11/02/diwali-2026-if-you-wish-to-receive-the-blessings-of-goddess-lakshmi-this-diwali-avoid-these-7-mistakes/

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया करून उमेदवारांना त्यांच्या अर्जात बदल करण्याचा पर्याय दिला जाईल. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही देखील 5 नोव्हेंबर 2026 पर्यंत असणार आहे. त्यानंतर परीक्षा आयोजित करणारी संस्था 6 नोव्हेंबर रोजी अर्ज दुरुस्ती विंडो उघडेल आणि ती 7 नोव्हेंबर 2026 रोजी बंद करेल. ज्या अर्जदारांनी आधीच त्यांचे अर्ज सादर केले आहेत, त्यांनाही या कालावधीत दुरुस्ती तपशिलात बदल करता येतील. (SWAYAM July Semester Exam 2026)

exams.nta.nic.in/swayam या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, “SWAYAM July Semester Registration 2026” या लिंकवर क्लिक करणे.
एक नवीन लॉगिन विंडो स्क्रीनवर दिसेल.
त्यात आवश्यक माहिती भरा.
अर्जामध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा.
अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेज डाउनलोड करुन ठेवा.

वेळ आणि तारीख
स्वयं जुलै सत्राची परीक्षा 8,9,10,11 आणि 12 डिसेंबर 2026 रोजी दोन सत्रांमध्ये घेण्यात येईल. पहिले सत्र सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 पर्यंत आणि दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6 पर्यंत चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here