Sanjay Gupta : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे
मिळालेल्या वृत्तानुसार, घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. मात्र, नेमकी घटना कशी घडली, याबाबत वेगवेगळ्या बातम्यांमध्ये काही तपशील वेगळे दिले आहेत. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
https://www.prahaar.in/2026/10/31/mumbai-municipal-corporation-to-evaluate-its-electricity-consumption-a-technical-committee-will-soon-be-formed-by-the-civic-body/
‘कांटे’ चित्रपटामुळे मिळाली विशेष ओळख
संजय गुप्ता यांनी 1994 मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, कुमार गौरव आणि लकी अली यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
क्राइम, ॲक्शन आणि गँगस्टर कथांना वेगळ्या शैलीत मांडणे ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दमदार संवाद, ॲक्शन दृश्ये आणि मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचे चित्रण यामुळे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
फिल्ममेकर अशोक पंडित ने कन्फर्म किया कि फिल्म ‘कांटे’ और ‘शूटआउट एट लोखंडवाला’ के लिए मशहूर फिल्ममेकर संजय गुप्ता का निधन हो गया है।
(फाइल फोटो) https://t.co/t2DOBvgGJy
— ANI_HindiNews (@AHindinews) October 31, 2026
‘काबिल’, ‘शूटआउट ॲट वडाला’सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन
‘कांटे’नंतर संजय गुप्ता यांनी ‘मुसाफिर’, ‘जिंदा’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘काबिल’मध्ये हृतिक रोशन आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत होते. ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटाच्या निर्मितीशीही त्यांचा संबंध होता.
त्यांच्या चित्रपटांमध्ये मुंबईतील अंडरवर्ल्ड, गुन्हेगारी, सूड आणि मैत्री यांसारख्या विषयांना विशेष स्थान होते. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले.
कमाल आर. खान यांच्यासह कलाकारांकडून श्रद्धांजली
संजय गुप्ता यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला. अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. संजय गुप्ता यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान होते, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या.
संजय गुप्ता यांनी अनु लेखी यांच्याशी विवाह केला होता. दोघांचा काही काळानंतर घटस्फोट झाला; मात्र 2009 मध्ये त्यांनी पुन्हा विवाह केला होता. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.