Home एक्सक्ल्युजिव्ह Nitesh Rane: समुद्री पर्यावरणाचे नुकसान होऊ देणार नाही; 20 होर्डिंग्ज उभारण्याचे वृत्त दिशाभूल करणारे

Nitesh Rane: समुद्री पर्यावरणाचे नुकसान होऊ देणार नाही; 20 होर्डिंग्ज उभारण्याचे वृत्त दिशाभूल करणारे

0
Nitesh Rane: समुद्री पर्यावरणाचे नुकसान होऊ देणार नाही; 20 होर्डिंग्ज उभारण्याचे वृत्त दिशाभूल करणारे
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Photo: @NiteshNRane X)

मुंबई: मुंबईच्या किनारपट्टीवर तब्बल 20 ठिकाणी फ्लोटिंग होर्डिंग्ज उभारण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व अफवा असून यात कोणतीही तथ्य नसून हा प्रकार पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या प्रस्तावात प्रत्यक्षात केवळ 4 होर्डिंग्जचा उल्लेख आहे, त्यापैकी 2 आधीपासूनच अस्तित्वात असून केवळ 2 नवीन होर्डिंग्ज उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/30/fire-at-vn-sphere-mall-in-bandra-west-fire-brigade-vehicles-at-the-scene/

जुहू बीच, कार्टर रोड, मार्वे जेट्टी आणि वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात जाहिरातींसाठी फ्लोटिंग होर्डिंग्ज आणले जात असल्याच्या वृत्तामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, मुंबईचे सागरी पर्यावरण आणि किनारपट्टीचे सौंदर्य जपण्यास सरकारचे प्राधान्य आहे. पर्यावरणाला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही उपक्रमाला अजिबात पाठिंबा दिला जाणार नाही.

या संपूर्ण प्रकरणावर विनाकारण राजकारण न करण्याचे आवाहन करतानाच, विकास आणि पर्यावरण यांच्यात योग्य समतोल राखणे हीच सरकारची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. सरकार या विषयावर पूर्णपणे पारदर्शक कारभार करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here