Home क्रीडा IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत ‘A’ मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?

IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत ‘A’ मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?

0
IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत ‘A’ मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवड समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. (Photo: ANI)
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. आगामी सामन्यांसाठी सावरण्याकरिता त्याला आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला संघातू वगळलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. (Photo: ANI)
न्यूझीलंड ‘ए’ आणि भारत ‘ए’ यांच्या चार दिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी भारत ‘ए’ संघात प्रसिद्ध कृष्णाचा समावेश केला आहे. या सामन्यांमध्ये त्याची फिटनेस चाचणी घेतली जाईल. त्याला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सराव करण्याची संधीही मिळेल. (Photo: ANI)
भारताचा वेगवना गोलंदाज मोहम्मद सिराजबाबतही एक बातमी समोर आली आहे. 31 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या औपचारिक कसोटी सामन्यात खेळणाऱ्या भारत ‘ए’ संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. (Photo: ANI)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दोन कसोटी सामन्यांची मालिका 19 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये, तर दुसरा क्राइस्टचर्चमध्ये खेळला जाईल.(Photo: ANI)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here