Home ब्रेकिंग न्यूज Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर

Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर

0
Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर
इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर
Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. पुलाच्या कामासाठी करण्यात येत असलेला मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने दोन बांधकाम कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/the-simhastha-mahadhwaja-grand-flag-installation-ceremony-begins-today-the-main-flag-hoisting-will-be-performed-by-the-president-on-saturday/

नाश्त्यासाठी गेलेले दोन कामगार बचावले

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एकूण पाच कामगार काम करत होते. अपघाताच्या वेळी त्यापैकी दोन कामगार नाश्ता करण्यासाठी गेले होते, तर एक कामगार कामाच्या ठिकाणापासून काही अंतरावर उभा होता. त्याचवेळी अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला. त्यामुळे उर्वरित दोन कामगार थेट मातीखाली दबले गेले.

या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या कामगाराला बेशुद्धावस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य

दुर्घटनेची माहिती मिळताच इंदापूर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात आले.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मातीचा भराव नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here