Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon Accident : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर भीषण अपघात, तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या युवकाचा अंत

Jalgaon Accident : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर भीषण अपघात, तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या युवकाचा अंत

0
Jalgaon Accident : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर भीषण अपघात, तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या युवकाचा अंत

Jalgaon Accident : जळगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर भीषण अपघातात घडला असून या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. योगेश गजमल राक्षे (३२, रा. पथराड, ता. धरणगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?

योगेश गजमल राक्षे हा आव्हाणे येथील एका खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होता. मंगळवारी पथराड येथील मुकादम चेतन शितोळे यांच्यासोबत कामावर तो आला होता. दुपारी साधारण पावणेचारच्या सुमारास तो घरी निघाला आणि आपल्या दुचाकीने प्रवास सुरू केला. मात्र प्रवासात काळाने घाला घातला. पाळधी रेल्वे मार्गावरील पुलावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, योगेश हा दुचाकीसह पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/nashik-governor-jishnu-dev-varma-arrives-in-nashik/

अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाला योगेशच्या मोबाईलवरून त्याचा मुकादम असलेल्या चेतन शितोळे याच्याशी संपर्क साधता आला. वाहनचालकाने अपघाताची माहिती दिल्यानंतर चेतन यांनी योगेशच्या चुलत भावाला घटनेची कल्पना दिली. त्यानंतर दोघांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी योगेशला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून योगेशला मृत घोषित केले.

मृत्यूचा सापळा ?

उपलब्ध माहितीनुसार, जुलैपासून आतापर्यंत बाह्यवळण महामार्गामुळे २५ अपघात झाल्याने १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पाळधी रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या अपघातामुळे मृतांच्या आकडेवारीत आणखी एका मृत्यूची भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here